व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हिना त्या मराठी चाहत्यांची मिमिक्री करीत आहे, जे शिल्पा शिंदेचे चाहते होते. हे चाहते शिल्पाच्या नावाने कसे ओरडत होते, याची मिमिक्री हिना करीत असताना दिसत आहे. मिमिक्री करताना हिना विकासला सांगते की, ‘तू ते बघितले काय? छोट्या-छोट्या ग्रुपमधील काही चाहते सिल्पा-सिल्पा म्हणून तिच्या नावाने ओरडत होते.’ यावर विकास म्हणतो की, ‘ती महाराष्टÑीयन असून, तिच्या चाहत्यांची संख्या अधिक आहे.’
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक शिल्पाला ट्रोल करीत आहेत. कोणी म्हणत आहे की, शिल्पा मराठी नाही तर कोणी म्हणत आहे की, ती मुंबईमध्ये कुठे राहते? पण काहीही असो, शिल्पा शिंदेचा प्रभाव पाहता हिना आणि विकास स्वत:ला असुरक्षित समजत असावेत. कारण बºयाच सेलिब्रिटींच्या मते, शिल्पा शिंदेच बिग बॉस ११ ची विनर असणार आहे.
@bollywood_life Hina Khan mocking Maharashtrians by the way they speak - “Silpa Silpa” and also Shilpa’s fans! #BB11pic.twitter.com/VeWo9sboxQ— ~Vinci~⚡️