काही दिवसांपूर्वीच अर्शी खानचा एक फोटो लीक झाला. ज्यामध्ये ती रियाज गंगजीच्या बुटीकमध्ये बघावयास मिळत आहे. खरं तर अर्शीने बराच विचार केल्यानंतर हा ड्रेस परिधान करण्याचा निर्णय घेतला आहे. रियाजनेदेखील या वृत्तास दुजोरा दिला आहे. मात्र त्याने याविषयी आणखी माहिती देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. वास्तविक अर्शी जो ड्रेस परिधान करणार आहे, तो वाइन कलरच गाऊन असेल, ज्याला फ्यूजन आउटफिट असे म्हटले जाते.
अर्शी खानची पब्लिसिस्ट आणि मॅनेजर फ्लिन रेमेडिओजने म्हटले की, रियाज अर्शी खानच्या फेव्हरेट फॅशन डिझायनरपैकी एक आहे. त्यामुळे अशा मोठ्या कार्यक्रमात रियाजची निवड केल्यास नवल वाटू नये. वृत्तानुसार, फिनालेमध्ये अर्शी खान हितेन तेजवानी याच्यासोबत परफॉर्मन्स करताना बघावयास मिळणार आहे.