Join us  

Bigg Boss 11 फेम महिला स्पर्धकाने मित्राविरोधात केला बलात्काराचा आरोप, FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 11:02 AM

बिग बॉस 11 मध्ये ही स्पर्धक खूप चर्चेत राहिली होती.

टीव्हीवरील वादग्रस्त शो 'बिग बॉस' च्या ११(Bigg Bigg 11) व्या सीझनमधील एका महिला स्पर्धकाने मित्राविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. बिग बॉस 11 च्या या स्पर्धकानुसार मित्राने तिला फ्लॅटवर बोलावले आणि बलात्कार केला. तिने मित्राविरोधात दिल्ली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसंच पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. 

'आज तक'च्या रिपोर्टनुसार, ही महिला स्पर्धक बिग बॉस 11 च्या सीझनमध्ये खूप चर्चेत होती. याआधीही ही स्पर्धक अनेकदा वादात अडकली आहे. बिग बॉसमध्ये असताना तिने होस्ट सलमान खानसोबत खूप मजामस्तीही केली. मात्र घरातून बाहेर पडल्यानंतर तिला काही फारसं काम मिळालं नाही, प्रसिद्धीही मिळाली नाही. मात्र ती सीझनभर फार चर्चेत राहिली होती. 

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पीडित महिला स्पर्धकाचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. 'बिग बॉस 11' मध्ये शिल्पा शिंदे, अर्शी खान, हिना खान, बेनाफ्शा सूनावाला, विकास गुप्ता, हितेन तेजवानी, प्रियांक शर्मा, पुनीश, आकाश ददलानी, लव, बंदगी कालरा, सपना चौधरी, मेहजबी, शिवानी दुर्गा, ज्योति कुमारी, जुबैर खान, सब्यसाची सतपति आणि ढिंचॅक पूजा यांचा समावेश होता. तर शिल्पा शिंदे या सीझनची विजेती ठरली होती. 

काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस 17' च्या महाअंतिम सोहळा पार पडला. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सीझनचा विजेता ठरला. तर अभिषेक कुमार हा रनर अप ठरला. या सीझनमध्ये अंकिता लोखंडे आणि पती विकी जैनचीही खूप चर्चा झाली. 

टॅग्स :बिग बॉससलमान खानपोलिसदिल्ली