त्याचे झाले असे की, बिग बॉसने या आठवड्यात तीन सेलिब्रिटींना घरात प्रवेश देऊन घरातील सदस्यांकडून होत असलेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून देण्यास सांगितले होते. त्यानुसार करण पटेल हा सर्वांत अगोदर घरात प्रवेश करतो. जेव्हा करण प्रवेश करतो, तेव्हा घरातील अन्य सदस्यांना स्टॅच्यू म्हणून राहण्यास बिग बॉसकडून आदेश मिळतो. करण घरातील काही सदस्यांच्या भेटी घेतल्यानंतर हिना खानकडे जातो. वास्तविक करणने हिनाचा या अगोदरही ट्विटरच्या माध्यमातून समाचार घेतला आहे. अशात समोरासमोर हिनाची कानउघडणी करण्याची संधी मिळाल्याने, तो हिनाला तिच्या खेळाविषयी बरेचसे सल्ले देतो. तो म्हणतो की, ‘तू जे काही उलटसुलट बोलतेस ते १३० कोटी जनता बाहेर बघत आहे.’ करणचे हे शब्द ऐकताच हिना आश्चर्यचकीत असल्याची रिअॅक्शन देते.
}}}} ">The housemates are grilled by our special guests with some tough questions! Keep watching #BB11 to witness all the drama! @KARISHMAK_TANNA@TheKaranPatelpic.twitter.com/g7Smt6tJlB— COLORS (@ColorsTV) December 8, 2017
त्यानंतर करिष्मा तन्ना आणि रोहन मेहरा एकापाठोपाठ घरात प्रवेश करतात. हे दोघेदेखील हिनालाच डोस पाजताना दिसतात. रोहन हिनाला म्हणतो की, ‘तू अन्य सदस्यांच्या तुलनेत खूप मोठे सेलिब्रिटी आहेस, अशात तुझ्याकडून जे काही बोलले जात आहे त्याचा बाहेर चुकीचा संदेश जात आहे. तू सेलिब्रिटींबद्दल बोलणे बंद कर.’ तर करिष्मा हिनाला म्हणते की, ‘तू जे काही बोलते त्यावर तुझी भूमिका ठाम असायला हवी, पण तसे तू वागत नाही.’ हिनाला या दोघांच्या सल्ल्यांपेक्षा करणने दिलेला सल्ला चांगलाच झोंबतो. जेव्हा करण सलमान खानसोबत मी टीव्हीच्या माध्यमातून हिनासमोर जातो, तेव्हा हिना त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना दिसते. त्याचबरोबर तू एवढे बोलल्यापेक्षा काहीकाळ घरात राहून दाखव, असे आवाहनही करते. परंतु करण पुन्हा ती कशा धुर्त पद्धतीने गेम खेळत आहे, हे दाखवून देतो.