बंदगीला जेव्हा विचारण्यात आले की, नॅशनल टीव्हीवर इंटीमेट होणे योग्य आहे काय? त्यावर तिने म्हटले की, जेव्हा तुम्ही एवढा काळ घरात एकत्र असता तेव्हा तुम्ही विसरून जाता की, तुमच्या आजूबाजूला कॅमेरे आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्याशी कनेक्ट होता, तेव्हा तुम्हाला निश्चितपणे तो तुमचा बॉयफ्रेंड आहे काय? असा प्रश्न विचारला जातो. माझ्यात आणि पुनीशमध्ये जे काही घडले त्याचा मला अजिबातच पश्चात्ताप होत नाही. मी असे म्हणणार नाही की मी योग्य होते, परंतु जे घडले ते तत्कालीन होते. जेव्हा बंदगीला विचारण्यात आले की, तुझे पॅरेंट्स शो बघत होते? तेव्हा तिने म्हटले की, ‘परिवारातील लोक आपले असतात. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की, एकदा त्यांच्याशी याविषयी बोलल्यानंतर ते मला समजून घेतील.
यावेळी बंदगीला हेदेखील विचारण्यात आले की, घरातील इतर सदस्यांना तुझा रोमान्स जरा अधिकच वाटत होता? तेव्हा तिने म्हटले की, घरातील सर्व लोक खूप स्मार्ट आहेत. त्यांना अशी अपेक्षा आहे की, लोकांनी याविषयी चर्चा करावी. त्यामुळे मी सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करण्यास तयार आहे. जेव्हा बंदगीला घरात सर्वात प्रबळ खिलाडी कोण असे विचारले असता, तिने शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ताचे नाव घेतले. ते दोघे एकमेकांना कडवी टक्कर देत आहेत. मात्र अंतिमत: विकास गुप्ताच या शोची ट्रॉफी पटकविणार आहे.