Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 11 : अर्शी खानचे सत्य आले समोर; बिग बॉस शोमधून मिळणारा पैसा ‘यांना’ देणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 18:25 IST

बिग बॉस सीजन ११ मधील स्पर्धक अर्शी खान हिच्याशी संबंधित एक मोठे वास्तव समोर आले आहे. सध्या अर्शी या ...

बिग बॉस सीजन ११ मधील स्पर्धक अर्शी खान हिच्याशी संबंधित एक मोठे वास्तव समोर आले आहे. सध्या अर्शी या शोमध्ये चांगली खेळत असून, शिल्पा शिंदेसोबतची तिची दुश्मनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, अर्शी खानचे मॅनेजर आणि पब्लिसिस्ट फ्लिन रेमेडिओजने अर्शीबद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, बिग बॉस या शोमधून मिळणारा सर्व पैसा  अर्शी स्ट्रीट चिल्ड्रेन्सच्या शिक्षणासाठी दान करणार आहे. फ्लिनने सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून अर्शी खान तिचा वाढदिवस स्ट्रीट किड्ससोबत सेलिब्रेट करीत आहे. याव्यतिरिक्त चॅरिटीसाठी अर्शी नेहमीच पुढाकार घेत असते. सध्या २०१५ मधील एक व्हिडीओ रिलीज करण्याची तयारी केली जात आहे. या व्हिडीओमध्ये अर्शी खान स्ट्रीट किड्सला जेवणाच्या साहित्याचे वाटप करताना दिसत आहे. फ्लिनने म्हटले की, हा आम्ही खोटा दावा करीत नाही. तर हे तिच्या संस्कारांमध्येच आहे. ते गेल्या काही काळापासून स्ट्रीट किड्सकरिता काम करीत आहे. त्या मुलांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्यासाठीही अर्शी एक सपोर्ट ग्रुप स्थापन करण्यासाठी धडपड करीत आहे. कारण अर्शीची ही मनापासून इच्छा आहे की, या मुलांनी नोकरी करून आपल्या आयुष्याला एक दिशा द्यावी. दरम्यान, अर्शी खान हिने बिग बॉसच्या घरात आपले जलवे दाखवित प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. सुरुवातीला काही दिवस ती शिल्पा शिंदेची खास मैत्रीण होती. परंतु आता या दोघींच्या मैत्रीत दरार पडली असून, त्यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. दोघींमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना वाद होताना दिसत आहे. अर्थात हा शोचा भाग आहे. परंतु अर्शीच्या मॅनेजरकडून जो दावा केला जात तो प्रत्यक्षात उतरेल काय, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.