त्याचे झाले असे की, अर्शी आणि आकाश डायनिंग टेबलवर बसलेले असतात. दोघे आपापसात खूप चेष्टा मस्करी करीत असतात. मात्र अर्शीच्या काही गोष्टी आकाशला अजिबातच आवडत नसल्याने तो टेबलवरून उठून जातो. कॅमेºयासमोर तो बिग बॉसकडे अर्शीची तक्रार करताना म्हणतो की, ती त्याला खूप त्रास देत आहे. पुढे विकासही या दोघांच्या चर्चेत उडी घेत अर्शीला समजावून सांगतो की, तिने असे काही करू नये.
त्यामुळेच या आठवड्यात अर्शी आणि आकाशमध्ये खूप दुरावा निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच कुशन बाजार टास्कमध्ये आकाश अर्शीसोबत नव्हे तर शिल्पा शिंदेसोबत उभा राहिला. एवढेच नव्हे तर केवळ शिल्पामुळे त्याने टास्कमध्ये जिंकलेले सर्व पैसे घरातील इतर सदस्यांना दिले. तर अर्शी आकाशवर यामुळे नाराज होती की त्याने शिल्पाला सांगितले, ती त्याला केवळ टास्कपुरतेच युज करीत आहे. खरं तर अर्शी आणि आकाशमधील मैत्री सुरुवातीपासूनच बघावयास मिळाली. परंतु अर्शीने आकाशबरोबर केलेल्या या अश्लील प्रतापामुळे दोघांमध्ये आता दुरावा निर्माण झाला आहे. सध्या अर्शी विकास आणि मेहजबी सिद्दिकीबरोबर कालकोठरीची शिक्षा भोगत आहे.