सलमान खानने अर्शी खानला म्हटले की, तू ज्यापद्धतीने शिल्पावर आरोप लावला तो पूर्णत: चुकीचा आणि निराधार आहे. तिने तुझ्या वडिलांबद्दल तसे काहीही केले नव्हते. परंतु ज्यापद्धतीने तू शिल्पाच्या आईबरोबर बोलताना शब्दप्रयोग केला तो पूर्णत: चुकीचा आहे. मात्र सलमानची ही बाब अर्शीला चांगलीच खटकली. तिने सलमानसोबतच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तिने जाहीरपणे सलमानवर आरोप लावताना म्हटले की, ‘तू शिल्पा शिंदेची बाजू घेतोस’ अर्शीने म्हटले की, ‘सलमान साहब आप हमेशा शिल्पा की साइड लेते हैं’!
}}}} ">.@Beingsalmankhan questions Arshi Khan about her comment to Shilpa Shinde. Tune in to #WeekendKaVaar tomorrow at 9 PM to find out what happens! pic.twitter.com/f9XImm4vh5— COLORS (@ColorsTV) December 8, 2017
मात्र यावर सलमान विकास गुप्ताला टोमणा मारताना, हीच का तुझी कॅप्टन चॉइस’ असे म्हणतो. दरम्यान, गेल्या काही काळापासून अर्शी शिल्पाबद्दल प्रचंड निगेटिव्ह असल्याचे दिसून येत आहे. ती शिल्पा सातत्याने टोमणे मारत असून, तिच्यासोबत हुज्जत घालण्याची एकही संधी ती सोडताना दिसत नाही. आता या वीकेण्डच्या वारमध्ये सलमान शिल्पाची कशी क्लास घेतो हे बघणे मजेशीर असेल.