मात्र चर्चा काहीही रंगत असली तरी विकासने अर्शीसोबतची मैत्री अखेरपर्यंत पार पाडली यातही काही शंका नाही. दरम्यान, घराबाहेर पडल्यानंतर अर्शीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउण्टवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये ती जोरजोरात रडताना दिसत आहे. तसेच घरातील तिचा मित्र विकास गुप्ताची तिला आठवण येत असल्याच सांगत आहे. त्याचबरोबर व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला विकास गुप्ता सपोर्ट करण्यासही आवाहन करीत आहे.
वास्तविक अर्शी खान जोपर्यंत या शोमध्ये होती तोपर्यंत तिने घरात खूपच चांगल्या पद्धतीने गेम खेळला. आपल्या जलव्यांनी तिने प्रेक्षकांना घायाळ केले होते. अर्शीची नाइटी तर प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. हितेन तेजवानीबरोबरचे तिचे संबंध प्रचंड चर्चेत राहिले. त्यामुळे ती या शोची विनर ठरू शकते अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र मध्येच एविक्शनमध्ये घराबाहेर पडावे लागल्याने तिच्या चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असेल यात शंका नाही.