Bigg Boss 11:11च्या स्पर्धकांना घरात दाखल होण्याआधीच सलमान खानने दिला सज्जड दम, काय म्हणाला दबंग खान जाणून घ्या ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 10:20 IST
बिग बॉस हा रियालिटी शो प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बिग बॉसच्या पहिल्या सीझनपासून ते दहाव्या ...
Bigg Boss 11:11च्या स्पर्धकांना घरात दाखल होण्याआधीच सलमान खानने दिला सज्जड दम, काय म्हणाला दबंग खान जाणून घ्या ?
बिग बॉस हा रियालिटी शो प्रत्येक सीझनमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बिग बॉसच्या पहिल्या सीझनपासून ते दहाव्या सीझनपर्यंत शोमध्ये घरातील स्पर्धकांमध्ये काही ना काही वाद कायमच झाले आहेत. मग ते शोमध्ये स्पर्धकांमधील वाद असो, भांडणे असो दरवेळी कायमच त्याची चर्चा झाली. वादविवाद आणि भांडणासोबतच स्पर्धकांच्या बिग बॉसच्या घरातील कॅमे-यात कैद झालेल्या हरकतीसुद्धा चर्चेत राहिल्या. कॅमे-यासमोर खुलेआम किसिंग, स्विमिंग पूलमधील रोमान्स यानेही रसिकांना खिळवून ठेवलं. कधी कधी हे वाद इतके टोकाला गेले की बिग बॉस हा शो बंद करण्याचीही मागणी झाली. तर कधी हा शो स्क्रीप्टेड असल्याचा आरोपही अनेकदा झाला. बिग बॉसमधील वाद, भांडणं, वाईट हरकती यामुळे शोचा होस्ट सलमान खान यानेही शो सोडण्याचा इशाराही दिला होता. याच पार्श्वबूमीवर बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये काय काय घडणार याची रसिकांनी उत्सुकता लागली आहे. मात्र यावेळी बिग बॉस सीझन-11मध्ये कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही असा सज्जड इशाराच अभिनेता सलमान खानने दिला आहे. घरात होणारे छोटे मोठे वाद, भांडणं आपण समजू शकतो, मात्र घरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता किंवा गैरवर्तन बिल्कुल खपवून घेणारच नाही असा इशारा सलमान खानने शोच्या लॉन्चिंगच्या वेळी दिला आहे. दरवेळी होणारी टोकाची भांडणं, वादविवाद आणि वाईट हरकती टाळण्यासाठी यावेळी बिग बॉसमध्ये काही कठोर नियम असतील असे संकेतही सलमानने दिले आहेत. बिग बॉसच्या सीझन-10मध्ये घरातील स्पर्धक स्वामी ओमच्या ऑन कॅमेरा हरकतींमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद इतका टोकाला गेला होता की सलमान आणि स्वामी ओम यांचीही तू-तू-मैं-मैं झाली होती. बिग बॉस-10 हा शो संपल्यानंतरही विविध वाहिन्यांवरुन स्वामी ओमनी सलमान आणि बिग बॉस शो आणि संबंधित वाहिनीबाबत ब-याच गोष्टी उघडपणे व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे याची पुनरावृत्ती बिग बॉस सीझन-11मध्ये होऊ नये याची खबरदारी खुद्द सलमानने घ्यायचं ठरवलं आहे असंच यावरुन दिसतं आहे. म्हणतात ना दूधाने पोळलेला ताकही फुंकूनच पितो....