Join us

'रंग माझा वेगळा' मालिकेत मोठा ट्विस्ट, आर्यनच्या एन्ट्री मागचं गुपित होणार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 14:45 IST

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' या मालिकेचा नुकताच १०००वा भाग शूट करण्यात आला. दीपा आणि कार्तिकच्या लव्ह स्टोरीपासून झालेली मालिकेची सुरुवात आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या मालिकेचा नुकताच १०००वा भाग शूट करण्यात आला. यावेळी कलाकारांनी हा आनंदाचा क्षण सेटवर एकत्र साजरा केलेला पाहायला मिळाला. दीपा आणि कार्तिकच्या लव्ह स्टोरीपासून झालेली मालिकेची सुरुवात आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेने अनेक वर्षांचा लीप घेतला असल्याने दीपिका आणि कार्तिकीच्या देखील प्रेमाची गोष्ट मालिकेत पाहायला मिळत आहे. 

मालिकेच्या लीपमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक बदल घडून आले. इकडे कार्तिक दीपा विषयीची अढी मनात बाळगून असतानाच कार्तिकी देखील दीपाचा द्वेष करताना दिसते. आता त्यांच्या आयुष्यात आणखी एक वादळ येणार आहे. इतके दिवस मालिकेतून बाहेर पडलेली आयेशा पुन्हा दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात येणार असल्याने मालिकेला एक धक्कादायक ट्विस्ट मिळणार आहे. यात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे कार्तिकी आणि दीपिकाच्या आयुष्यात आलेला आर्यन देखील त्याचे रंग दाखवायला सुरुवात करणार आहे. 

कार्तिकीला आपल्या प्रेमाची भुरळ घालणारा आर्यन दुसरा तिसरा कोणी नसून तो आयेशाचा भाचा आहे. आपल्या मावशीची झालेली ही अवस्था पाहून आर्यन त्याचा बदला घेण्यासाठी इनामदार कुटुंबात वादळ बनून येणार आहे. आयेशा कार्तिकच्या प्रेमात वेडी झालेली आहे. तिच्या या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या कार्तिक आणि दिपावर तो सूड उगवणार आहे. मुळात आर्यन याच उद्देशाने कार्तिकीच्या प्रेमात पडल्याचे नाटक करतो आहे. आर्यन आणि आयेशा दोघेही मिळून आता इनामदार कुटुंबाला बरबाद करण्याचा घाट घालत आहेत. मालिकेतला हा ट्विस्ट मात्र प्रेक्षकांना चक्रावून सोडणारा आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह