Join us

'रंग माझा वेगळा' मालिकेत मोठा ट्विस्ट, पुन्हा थाटामाटात होणार कार्तिक आणि दीपाचं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 08:00 IST

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कार्तिक आणि दीपा एकमेकांपासून विभक्त झाले होते. अखेर कार्तिकची फर्टिलिटी टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि त्या दोघांमधील गैरसमज दूर होतो. तरीदेखील दीपा त्याच्यासोबत न राहण्याचा निर्णय सांगून तिथून निघून जाते. इतके दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ती अखेर घडणार आहे. पुन्हा एकदा मालिकेत कार्तिक आणि दीपाचा लग्न सोहळा पार पडणार आहे. 

कार्तिक आणि दीपा यांच्यातील गैरसमज अखेर दूर झाले आहेत. कार्तिकने सौंदर्या आणि दीपाच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा फर्टीलिटी टेस्ट केली आणि या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता दीपिका आणि कार्तिकी त्यांचीच मुली आहेत, हे कार्तिकने मान्य केले आहे. तर, आता कार्तिक दीपाची माफी मागणार असून, या मुली माझ्या म्हणजेच आपल्या असल्याचे सत्य तो स्वीकारणार आहे. पुन्हा एकदा कार्तिक दीपाकडे आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे.

मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार सत्य समजताच कार्तिक सगळ्यांसमोर दीपाची हात जोडून माफी मागणार आहे. तो दीपाला म्हणतो, 'मला माफ कर दीपा. इतके वर्ष मी खूप चुकीचा वागलो. तुझ्यावर नाही नाही ते आरोप केले, माझ्यासाठी तुला अग्निपरीक्षा द्यावी लागली. एक बाप म्हणून आणि नवरा म्हणून मी खूप चुकलो.ज्या कार्तिकने सगळ्यांसमोर तुला घराबाहेर काढले आज तोच कार्तिक सगळ्या जगासमोर तुझी हात जोडून माफी मागत आहे. मला माफ कर दीपा. दीपा मागचे सगळे विसरुन कार्तिकला माफ करुन पुन्हा एकत्र नांदताना दिसणार आहेत. पुन्हा एकदा त्या दोघांचे लग्न सौंदर्या लावून देणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा दीपा कार्तिकचा लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे.
टॅग्स :स्टार प्रवाह