Join us

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट, अखेर रेवाचा होणार पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 17:13 IST

Muramba Serial : 'मुरांबा' ही मालिका रंजक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मुरांबा(Muramba)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील रमा अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. सध्या ही मालिका रंजक वळणावर आली आहे. रेवाने अक्षयला मिळवण्यासाठी प्रेग्नेंट असल्याचे खोटे नाटक केले आहे. ती प्रेग्नेंट असल्याचे कळल्यावर आजी आणि शशिकांत रेवाला जास्त सपोर्ट करत आहेत. दरम्यान अक्षय, रमाला रेवा प्रेग्नेंट नसल्याचे कळले आहे आणि लवकरच हे सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. हे २१ जानेवारीच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

रमा आणि अक्षय रेवा प्रेग्नेंट असल्याचे नाटक सर्वांसमोर उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अक्षय रेवाची काळजी घेताना दिसत आहे. रेवा अक्षयला लोणावळ्यात बेबीमूनसाठी घेऊन येते. तिथे रमाही येते. ती तिथे असल्याचे रेवाला माहित नाही. तेव्हा अक्षय रेवाच्या तोंडून प्रेग्नेंट नसल्याचे सत्य वदवून घेणार आहे. नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात अक्षय रेवाला बोलताना दिसतो आहे की, मी जगातला असा दुर्देवी पुरूष आहे जो बेबीमूनला आला आहे पण त्याने त्याचा हनीमून केव्हा झाला आहे, हेच आठवत नाही आहे. त्यावर रेवा बोलते की, कसा आठवेल अक्षय. मी प्रेग्नेंट नाही आहे. मी हे सगळं नाटक करत होते. कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. त्यावर अक्षय बोलतो की, खरंच हे आधी सांगायचं ना.. त्या दोघांचं बोलणं लांबून रमा कॅमेऱ्यात कैद करते.

अखेर रेवाचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. तिचे हे सत्य सगळ्यांना समजल्यावर मुकादम कुटुंब काय करतील आणि तरीही आजी आणि शशिकांत तिला सपोर्ट करतील का, हे पाहावे लागेल. हा रंजक एपिसोड येत्या रविवारी म्हणजे २१ जानेवारीला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता पाहायला मिळेल. 

टॅग्स :स्टार प्रवाह