बिग बॉस-११ सीजनची स्पर्धक बंदगी कालरा पुनीष शर्मासोबतच्या जवळीकतेमुळे खूपच चर्चेत आहे. कारण बिग बॉसच्या घरात या दोन स्पर्धकांनी अक्षरश: अश्लीलता पसरविली असून, प्रेक्षकांमध्येही त्यांच्याबद्दल आता संताप व्यक्त केला जात आहे. या दोघांचा हा प्रताप बघून बिग बॉस सीजन तीनचा विजेता विंदू दारा सिंग हा तर अक्षरश: संतापला आहे. त्याने एक ट्विट करून बंदगीला फिमेल इमरान हाशमी असे म्हटले आहे. या आठवड्यात घरातील स्पर्धकांमध्ये कॅप्टनसीकरिता एक टास्क घेण्यात आला होता. यावरूनच विंदूने ट्विट केले असून त्यात त्याने म्हटले की, ‘घरातील फिमेल इमरान हाशमी नवी कॅप्टन बनली आहे.’ बंदगीने बºयाचदा पुनीषसोबत बिनधास्तपणे लिपलॉक सीन दिले. त्याचबरोबर ती बºयाचदा कोजी होतानाही बघावयास मिळाली.
बिग बॉसच्या तिसºया सीजनमध्ये सहभागी झालेला विंदू दारा सिंग या शोचा विजेता आहे. तो गेल्या काही काळापासून या शोला सातत्याने फॉलो करीत आहे. विंदूने केवळ बंदगीबद्दलच नव्हे तर नॉमिनेशन प्रोसेसनंतर हिना खान आणि आकाश ददलानी यांच्यावरही कमेंट केले. नॉमिनेशनदरम्यान हिनाला सेफ करण्यासाठी लवने त्याच्या कपाळावर मेहंदीने जिरो असे लिहिले होते. मात्र नंतर हिनाने मेकअपच्या साहाय्याने हे नाव काढून टाकले.
बिग बॉसने हिनाला अगोदरच आदेश दिले होते की, मेकअपच्या साहाय्याने हे नाव काढले जाऊ नये. परंतु असे असतानाही हिनाने ती चूक केल्यामुळे तिला नॉमिनेट करण्यात आले. हाच धागा पकडून विंदूने हिनाला ‘गजनी’ असे संबोधले. तर आकाश ददलानीला त्याने ‘टकला शैतान’ असे म्हटले.