Join us
Daily Top 2Weekly Top 5

Big Boss Marathi 2 : घरात अभिजीत बिचुकलेंचीच चर्चा ,शिवानी बिचुकलेंना देणार घर कामाचे धडे

By अजय परचुरे | Updated: June 6, 2019 15:02 IST

साताऱ्याच्या अभिजीत बिचकुलेंची लोकप्रियता बिग बाॅसमुळे आता महाराष्ट्रभर पसरली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये माधव आणि अभिजीत बिचुकले यांची चांगली मैत्री आहे... तर आज माधव आणि बिचुकलेंमध्ये एक संभाषण होताना दिसणार आहे, जिथे माधव म्हणतो आहे, तुम्ही सगळे माझी बाहेर जाण्याची वाट बघत आहात, मी इथे वाट बघतो आहे तुम्हाला बाहेर पाठविण्याची...हेच करतायना तुम्ही ? त्यावर बिचुकले म्हणाले १०० टक्के...  दिगंबर नाईक तिथे येताच या दोघांनी कारण दिले की त्यांचा परफॉर्मन्स आहे. आणि त्यानंतर माधवने हेच संवाद हिंदीमध्ये कसे म्हणायचे हे अभिजीत बिचुकले यांना सांगितले. 

 

तर दुसरीकडे पुन्हा एकदा शिवानी सुर्वे अभिजीत बिचुकले यांची शाळा घेताना दिसणार आहे.त्याचे असे झाले कि, शिवने कॅप्टन झाल्यावर घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी सदस्यांना वेगवेगळ्या टीम्स मध्ये टाकले.आणि त्यामुळे  अभिजीत बिचुकले आणि शिवानी सुर्वे हे एका टीममध्ये आले. आणि बिचुकले यांना घरच्या कामाची फारशी सवय नाही आणि त्यांना ते जमत देखील नाही याचा अंदाज शिवानीला आला आहे... शिवानीने बिचुकले यांना सांगितले मी रीझाईन करेन या कामामधून त्यावरून बिचुकले यांनी मजेदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. तर शिवानीने शिवला सांगितले मी जेवणाच्या टीममध्ये जाते आहे.असं कोण झाडू मारतं ? हा प्रश्न शिवानीला पडला आहे..

 बिग बॉसच्या घरात आलं कि प्रत्येक कामामध्ये सदस्यांना मदत करावी लागते. आणि आता शिवानी  बिचुकले यांना झाडू कशी मारायची हे  शिकवणार का ? हे बघणे गंमतीशीर असणार आहे. याआधी तिने बिचुकलेंना त्यांचे कपडे आणि जागा कशी साफ ठेवावी हे शिकवले होते.