Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस फेम नितिभा कौलने शेअर केला बोल्ड फोटो; चाहत्यांनी दिला वजन कमी करण्याचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST

बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन १० मध्ये झळकलेली नितिभा कौल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नितिभाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. फोटोत ती शॉर्ट्स आणि बिकिनी टॉपमध्ये बघावयास मिळत आहे. फोटोत तिच्या बॉडीवर टॅनिंग मार्क्सही दिसत आहेत. नितिभाने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये या मार्क्सचा उल्लेख केला. नितिभाचा हा फोटो तिच्या काही चाहत्यांना चांगलाच आवडला. परंतु काहींना मात्र तो अजिबातच पसंत आला नाही. त्यांच्या मते, फोटोमध्ये नितिभा खूपच फॅट दिसत असून, तिने वजन कमी करण्याची गरज आहे.

नितिभाच्या या फोटोला काही चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ती खूपच हॉट दिसत आहे. तर काहींनी चक्क तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, नितिभाला आता जिम ज्वाइन करण्याची गरज आहे.

नितिभा काही दिवसांपासून गोवा येथे आहे. ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करीत असते.

नितिभा कलर्स चॅनलच्या रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या सीजन-१० मध्ये झळकली आहे. शोदरम्यान तिच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

नितिभा शोचा विजेता मनवीर गुर्जर यांच्या खूप क्लोज होती. त्यामुळे त्यावेळी दोघांमधील अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या.

नितिभा लवकरच एमटीव्हीवरील ‘डेट टू रिमेंम्बर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये बघावयास मिळणार आहे. या शोमध्ये ती मेंटोरची भूमिका साकारणार आहे.

नितिभासोबत या शोमध्ये बिग बॉस १० चा स्पर्धक राहिलेला मनू पंजाबी आणि मॉडेल दिव्या अग्रवालही मेंटोरच्या रूपात बघावयास मिळणार आहेत.