Join us

​बिग बॉसचा हा स्पर्धक आहे कास्टिंग काऊचसाठी कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 16:31 IST

बिग बॉस सुरू होऊन आठवडा झाला नसला तरी या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. कारण आतापर्यंतच्या सगळ्या सिझनमधील हा ...

बिग बॉस सुरू होऊन आठवडा झाला नसला तरी या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. कारण आतापर्यंतच्या सगळ्या सिझनमधील हा इंटरेस्टिंग सिझन आहे. पहिल्या दिवसापासून सगळेच स्पर्धक एकमेकांशी प्रचंड भांडत आहेत. तसेच अतिशय वाईट शब्दांत एकमेकांशी बोलत आहेत. एकमेकांना शिव्या घालत आहेत. एवढेच नव्हे तर एकमेकांविषयी माहीत असलेली गुपिते लोकांसमोर मांडत आहेत. जुबैर खान या स्पर्धकाने तर बिग बॉसच्या घरात आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला. जुबैरची तब्येत आता चांगली असून त्याने सलमानविरोधात पोलिसात केस देखील दाखल केली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील ड्रामा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.Also Read : या कारणामुळे बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खानविरोधात झाली तक्रार दाखलशिल्पा शिंदेने भाभीजी घर पर है या मालिकेत काम केले होते. तिच्या या मालिकेची चांगलीच चर्चा झाली होती. पण या कार्यक्रमाच्या निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे तिने या कार्यक्रमाला रामराम ठोकला. शिल्पाने मालिका सोडली त्यावेळी विकास गुप्ता हा अँड टिव्हीचा क्रिएटिव्ह हेड होता. विकासने त्यावेळी शिल्पाची बाजू न घेतल्याने शिल्पाचा विकासवर चांगलाच राग आहे. त्यामुळे ती पहिल्या दिवसापासून विकाससोबत भांडताना आपल्याला दिसत आहे. आता तर शिल्पाने विकासच्या बाबतीत एक खुलासा नुकताच बिग बॉस या कार्यक्रमात केला आहे. विकास हा गे असल्याचे सगळ्यांनाच माहीत आहे. पण विकास टिव्ही इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच चालवत असल्याचे शिल्पाने म्हटले आहे. विकास गुप्ता हा छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध निर्माता असून त्याच्या लॉस्ट बॉय या प्रोडक्शन हाऊसने आतापर्यंत अनेक नवीन चेहरे छोट्या पडद्याला मिळवून दिले आहेत. त्यातही त्याच्या प्रोडक्शन हाऊसमुळे अनेक नायक छोट्या पडद्याला मिळाले आहेत. पण विकास कास्टिंग काऊचसाठी कारणीभूत आहे, तो महिला आणि पुरुष दोघांचाही छळ करतो. त्यातही पुरुष त्याच्या छळाला अधिक बळी पडतात असे शिल्पाने म्हटले आहे. शिल्पाने या सगळ्या गोष्टींबाबत नुकतीच बिग बॉसच्या घरात अर्शी खान आणि पुनीतसोबत चर्चा केली आहे.