होय, तुम्ही जर आतापर्यंत तुमच्या फेव्हरेट स्पर्धकाला वोट करत आला असाल अन् आता आपले काम संपले असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घाई करत आहात असेच म्हणावे लागले. कारण बिग बॉस ट्विस्ट्सचा गेम असल्याने यामध्ये एक ट्विस्ट येणार असल्याची बातमी व्हायरल होत आहे. असे म्हटले जात आहे की, टॉप २ मध्ये असलेल्या शिल्पा आणि हिना या दोघींपैकी एकीला विनर घोषित करण्याअगोदर पुन्हा एका लाइव्ह वोटिंग केले जाणार आहे. लाइव्ह वोटिंगच्या माध्यमातून हे स्पष्ट होणार की, दोघींपैकी कोण बाजी मारणार आहे?
#BiggBoss11#BB11#BiggBoss LIVE VOTING BETWEEN #ShilpaShinde & #HinaKhan WILL BE CONDUCTED FOR THE DECLARATION OF @BiggBoss WINNER— Bigg Boss Channel (@BiggBossChannel) January 14, 2018
दरम्यान, मास्टर माइंड या नावाने प्रेक्षकांची मने जिंकणारा विकास गुप्ता शोच्या बाहेर झाल्याने आता हिना आणि शिल्पामध्ये अंतिम फाइट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांच्या मते, शिल्पा शिंदे या शोची विनर ठरणार आहे. परंतु बिग बॉसच्या या नव्या ट्विस्टमुळे आताच याबद्दल काहीही सांगणे मुश्कील आहे. दरम्यान, दोघींपैकी कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल.