रिपोर्टनुसार हिना, प्रियांक शर्मा, लव त्यागी, आकाश ददलानी, शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता बिग बॉसच्या स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स करणार आहेत. मात्र कलर्स चॅनलने रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये पुनीश आणि बंदगीचाच परफॉर्मन्स अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. दोघेही पावसात ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा प्रोमो बघून पुनीश आणि बंदगीमधील हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील.
}}}} ">Paani mein aag lagane aa rahe hai #BB11 ke lovebirds, Puneesh Sharma aur @BandgiK! Catch them in the #BB11Finale, tonight at 9 PM. pic.twitter.com/wvNKayVLnc— COLORS (@ColorsTV) January 14, 2018
दरम्यान, सलमान खानही शिल्पा शिंदे, हिना खान, विकास गुप्ता आणि पुनीश शर्मासोबत स्वॅग से स्वागत या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. त्याचा हा परफॉर्मन्स बिग बॉसच्या घरातच होणार आहे. एकूणच बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त मस्ती बघावयास मिळणार आहे.