दरम्यान, सलमान खानही शिल्पा शिंदे, हिना खान, विकास गुप्ता आणि पुनीश शर्मासोबत स्वॅग से स्वागत या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. त्याचा हा परफॉर्मन्स बिग बॉसच्या घरातच होणार आहे. एकूणच बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त मस्ती बघावयास मिळणार आहे.}}}} ">Paani mein aag lagane aa rahe hai #BB11 ke lovebirds, Puneesh Sharma aur @BandgiK! Catch them in the #BB11Finale, tonight at 9 PM. pic.twitter.com/wvNKayVLnc— COLORS (@ColorsTV) January 14, 2018
Big Boss 11 : ग्रॅण्ड फिनाले अगोदरच दिसली पुनीश शर्मा अन् बंदगी कालरामधील हॉट केमिस्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 19:32 IST
काही तासांतच बिग बॉसच्या ग्रॅण्ड फिनाले एपिसोडला सुरुवात होणार आहे. मात्र त्याअगोदरच पुनीश आणि बंदगीमधील हॉट केमिस्ट्री बघावयास मिळाली आहे.
Big Boss 11 : ग्रॅण्ड फिनाले अगोदरच दिसली पुनीश शर्मा अन् बंदगी कालरामधील हॉट केमिस्ट्री!
जवळपास दीड तासात बिग बॉसचा फिनाले सुरू होणार असून, आजच्या एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या फिनाले संबंधीचे काही अपडेट्स आम्ही तुम्हाला अगोदरच देणार आहोत. आजची फिनाले हिना खान आणि शिल्पा शिंदेमध्ये रंगणार असून, या दोघींपैकी कोण विजेता ठरेल हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. रात्री ११ वाजता विजेत्याची घोषणा केली जाणार असून, लाइव्ह वोटिंगच्या माध्यमातून विजेता ठरणार आहे. दरम्यान, फिनालेमध्ये दोन फायनालिस्टसह शोमधून बाहेर पडलेले सर्व स्पर्धक फिनालेत धमाकेदार परफॉर्मन्स करणार आहेत. त्यात पुनीश शर्मा आणि बंदगी कालराचा परफॉर्मन्स सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. रिपोर्टनुसार हिना, प्रियांक शर्मा, लव त्यागी, आकाश ददलानी, शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता बिग बॉसच्या स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स करणार आहेत. मात्र कलर्स चॅनलने रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये पुनीश आणि बंदगीचाच परफॉर्मन्स अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. दोघेही पावसात ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा प्रोमो बघून पुनीश आणि बंदगीमधील हॉट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील.