त्याचे झाले असे की, रॉकीने नॅशनल टीव्हीवर असे काही वक्तव्य केले ज्यामुळे हिना त्याच्यावर रूसून बसली आहे. एक्स्ट्रा डोजमध्ये हिना लव त्यागीला सांगत आहे की, ‘रॉकीवर मी खूप नाराज आहे. कारण नॅशनल टीव्हीवर त्याने एकच जॅकेट दुसºयांदा परिधान केले आहे. वास्तविक त्याच्याकडे भरपूर जॅकेट्स आहेत. अशातही त्याने तेच कपडे का रिपीट केले? त्याचा हा स्वभाव मला अजिबातच आवडला नाही.’ तर दुसºया व्हिडीओमध्ये हिना लव याच्यावर नाराज होताना बघावयास मिळत आहे. कारण लव त्यागी तिला आउटफिट सिलेक्ट करण्यास अजिबातच मदत करीत नाही.
व्हिडीओमध्ये दाखविले जाते की, हिना कपड्यांची निवड करताना काहीशी गोंधळलेली असते. तिला नेमके कोणते कपडे परिधान करायला हवेत, हे सूचत नाही. कारण तिच्याकडे सर्वच ड्रेस घालून झाले असल्याने, ते पुन्हा रिपिट करणे तिला योग्य वाटत नाही. अशात ती लवचा सल्ला घेते, परंतु तो तिला याकामी मदत करण्यास स्पष्ट नकार देतो. आता आपल्या बॉयफ्रेंडच्या जॅकेटवरून ती त्याच्यासोबत वाद तर घालणार नाही ना? अशी शंका आता प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.