Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस १० : विक्रांत सिंह घराबाहेर पडताच मनू पंजाबीने मोनालिसाला विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 18:56 IST

बिग बॉस स्पर्धक मोनालिसा आणि तिचा बॉयफ्रेण्ड विक्रांत सिंह राजपूत यांच्या लग्नाला एक दिवसही उलटत नाही, तोच मनू पंजाबी याने मोनालिसाला असे काही म्हटले की ज्यामुळे घरातील संपूर्ण वातावरणच बदलून गेले आहे.

गेल्या बुधवारी धुमधडाक्यात व पूर्ण विधीनिशी पार पडलेल्या बिग बॉस स्पर्धक मोनालिसा आणि तिचा बॉयफ्रेण्ड विक्रांत सिंह राजपूत यांच्या लग्नाला एक दिवसही उलटत नाही, तोच मनू पंजाबी याने मोनालिसाला असे काही म्हटले की ज्यामुळे घरातील संपूर्ण वातावरणच बदलून गेले आहे. }}}} मोनालिसा आणि विक्रांत सिंह राजपुत यांच्या लग्नामुळे घरात प्रसन्न वातावरण होते. धुमधडाक्यात झालेल्या या लग्नसोहळ्यात भोजपुरी इंडस्ट्रीमधील रविकिशन, निरहुआ हे कलाकार सहभागी झाले होते. संपूर्ण रितीरिवाजानुसार पार पडलेल्या या सोहळ्यात घरातील मनवीर गुर्जर, मनू पंजाबी, लोपामुद्रा राऊत, बानी जे, रोहन मेहरा या सदस्यांनी जणू काही आपल्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा विवाह असल्याप्रमाणे सोहळ्यात भाग घेतला होता. त्यामुळे या लग्नसोहळ्यात एक वेगळीच रंगत आली होती. मात्र शोच्या सुरुवातीपासून मोनालिसाबरोबर नाव जुळले गेलेल्या मनू पंजाबीच्या मनात मात्र काही औरच चलबिचल सुरू असल्याचे समोर आले आहे. विवाहसोहळा पार पडल्यानंतर जेव्हा बिग बॉसने विक्रांत आणि मानोालिसाला कन्फेशन रूममध्ये बोलावून विक्रांतला घराबाहेर येण्यास सांगितले तेव्हा मोनालिसा खूपच भावूक झाली होती. विक्रांतला निरोप दिल्यानंतर जेव्हा ती कन्फेशन रूमच्या बाहेर आली तेव्हा मनू पंजाबी याने तिला विचारलेला जाब ऐकून ती चकीत झाली. मनू आणि मनवीर दोघेही गार्डन एरियामध्ये असताना मोनालिसा कन्फेशन रूममधून थेट या दोघांकडे आली. ती जवळ येत असल्याचे बघून दोघांनीही तिची टर्रर्र उडविण्याचे ठरविले. मनूने तिला म्हटले की, लग्नाचा निर्णय घेण्याअगोदर एका शब्दाने तरी मला विचारायचे असते. तू मला न विचारता लग्न करूच कशी शकतेस. दोघांचा संवाद सुरू असतानाच मनवीर मोनालिसाच्या बाजूने बोलताना म्हणाला की, तू जे काही केले ते अतिशय योग्य केले. कारण एका व्यक्तीचे (मनू) मनसुबे मला काही योग्य वाटत नव्हते. अर्थात हे दोघेही सर्व काही चेष्टामस्करीत बोलत होते. परंतु ही बाब मोनालिसाला फारसी आवडली नसावी. त्यामुळेच विक्रांत घराबाहेर पडल्यानंतर या दोघांप्रती तिच्या स्वभावात बराचसा बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. ही बाब मनू पंजाबी याच्या लक्षातही आली होती. त्याने मोनालिसाला तू बदलल्याचे बोलूनही दाखविले.