Join us

भोजपुरी अभिनेता विक्रांत सिंग राजपूत छोट्या पडद्यावर करतोय पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 14:33 IST

विक्रांत सिंग राजपूत, तो अवतार सिंगची भूमिका करताना दिसणार आहे आणि तो विद्याच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे.

टीव्हीवर नुकताच विद्या हा शो सुरू झाला आहे. त्यात विद्या नावाची एक अशिक्षित मुलगी अनावधानाने इंग्रजीची शिक्षिका बनते. विद्याच्या प्रमुख भूमिकेत मीरा देवस्थळे असून नमिश तनेजा जिल्हा न्यायाधीशाची, विवेक वर्धन सिंगची भूमिका साकारत आहे. शो मध्ये अजून एका अभिनेत्याचा प्रवेश होणार असून ती भूमिका साकारत आहे विक्रांत सिंग राजपूत, तो अवतार सिंगची भूमिका करताना दिसणार आहे आणि तो विद्याच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे.  

सध्या, शोमध्ये विद्याला नुकसानभरपाई म्हणून मिळालेल्या शिक्षिकेच्या नोकरीत सुख मिळत नाही कारण तिला त्या भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तिला शाळेत न पाठवण्यासाठी ती तिच्या कुटुंबियांना राजी करते पण तोपर्यंत दुसरीच समस्या पुढे उभी रहाते. अवतार सिंग हा विद्याला भावासारखा असतो पण तो खूपच हुकमती स्वभावाचा आहे.

 

तो विद्याला धमकावतो की एकतर शाळेत जा आणि शिकव नाहीतर तो तिच्या कुटुंबियांना संकटात टाकेल. तो एक नामवंत पैलवान, स्थानिक राजकारणी आणि हनुमानाचा भक्त सुध्दा आहे आणि तो 45 वर्षांचा झाला तरी ब्रम्हचारी व्रताचे पालन करत आहे. त्याच्या प्रवेशाने विद्याच्या जीवनात अनपेक्षित बदल घडून येणार आहे. 

त्याच्या भूमिकेविषयी बोलताना, विक्रांत म्हणाला, "विद्यामधून अवतार सिंगच्या भूमिकेतून टेलिव्हिजन वरील माझे पहिले पदार्पण करण्यासाठी मी उत्सुक आहे. माझे पात्र हे एका राजकारण्याचे असून त्याच्या समाजातील तो एक चांगला समारीतन आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना ही कथा आवडेल आणि ते शिक्षणाचे महत्व समजतील."