यानंतर भारती डेस्टीनेश वेडिंग करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे लग्नाच्या मुहुर्ताप्रमाणे भारती लग्नासाठी कोणते लोकेशन निवडणार याकडेही सा-यांचे लक्ष लागले होते. अखेर ती प्रतिक्षा संपली आणि भारतीने लग्नासाठी गोव्याची निवड केली आहे.भारतीचे थीम वेडींग असणार आहे.त्यामुळे कोणत्या अंदाजत पाहुणे मंडळी या जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी हजेरी लावणार या गोष्टीपासून ते भारती आणि हर्ष दोघांची ड्रेसिंग कशी असणार या सगळ्या गोष्टींवर बारकाईने मेहनत घेण्यात आली आहे. भारतीच्या लग्नात प्रत्येक गोष्ट खास बनवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लग्नपत्रिकाही खास स्टाइलने डिझाईन करण्यात आली आहे. पत्रिकेच्या कव्हरवर शंख शिंपल्यांचे डिझाईन आहे. पत्रिकेच्या बॅकग्राऊंडला अॅक्वा-ब्लाईंड कलर आणि समुद्राचा फील देण्यात आला आहे.'दुल्हा हम ले जाऐंगे' असे मोठ्या अक्षरात लिहिले गेले आहे. ही पत्रिका एका पांढऱ्या लाकडाच्या छोट्या पेटीत लॉक करुन पेटी निळ्या रंगाच्या रिबीनने डिझाइन करण्यात आली आहे.
हे तर झालं लग्नातल्या खास अट्रॅक्शनविषयी आता हे दोघे हनीमुनसाठी कुठे जाणार याविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.हनीमूनसाठी ते कपल महिन्याभरासाठी युरोप ट्रीपला जाणार आहेत.
ग्रीस, स्पेन, बारसालोना, इटली या ठिकाणी हे आपले हनीमुन एन्जॉय करणार आहेत.