Join us  

'मी आई होईन किंवा नाही, पण...'; नेहा पेंडसेने केला Eggs Freeze करण्याबाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 9:53 AM

Nehha pendse: नेहाला तिचे एग्ज फ्रीज करण्याबाबत तिच्या नवऱ्यानेच सल्ला दिला होता. कारण...

बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha pendse) हिची चर्चा रंगली आहे. अलिकडेच नेहाने ई-टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या मातृत्वाविषयी भाष्य केलं. इतंकच नाही तर तिने तिचे एग्ज फ्रीज (Eggs Freeze) केल्याचा खुलासा केला. तिच्या या खुलाश्यानंतर सोशल मीडियावर या चर्चेला उधाण आलं आहे.

२०२० मध्य नेहाने शार्दुल सिंग बायर याच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर नेहाची लाइफस्टाइल प्रचंड बदलली आहे. त्यामुळे ती सातत्याने तिच्या लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत येत असते. परंतु, यावेळी ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नेहाने नुकतंच मे आय कम इन मॅडमच्या दुसऱ्या सीझनमधून टेलिव्हिजनवर कमबॅक केलं यानिमित्ताने तिने ही मुलाखत दिली होती. यावेळी तिने आई होण्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. 

"लग्न झाल्यानंतर वर्षभरामध्येच मला आई व्हावं अशा भावना माझ्या मनात निर्माण व्हायला लागल्या होत्या. मुळात जिला कधीच आई व्हायचं नव्हतं तिच्या मनात अशा भावना निर्माण होणं ही गोष्य माझ्या आकलना पलिकडची आहे. त्यानंतर मी याविषयी गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली. कारण, एक मूल सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे", असं नेहा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी याविषयी खूप विचार केला आणि माझे एग्ज फ्रीज करण्याचा निर्णय घेतला. मला आई व्हायची इच्छा आहे पण इतक्यात मी त्या गोष्टीला तयार नाही. माझ्या नवऱ्यानेच मला हा सल्ला दिला. कदाचित मी आई होईन किंवा नाही  होणार. कारण, माझ्या मनातही याबद्दल खूप शंकाकुशंका होत्या.  मला कोणावरही अवलंबूनही राहायचं नाही. पण, मी स्वत:ला सुपरवुमन वगैरे काही मानत नाही. कारण, घर सांभाळणं आणि काम करणं या दोन्ही गोष्टींसाठी लागणारी ताकद माझ्यात नाहीत."

दरम्यान, नेहाने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या सिनेमा, मालिकांमध्ये काम केलं आहे. प्यार कोई खेल नहीं या हिंदी सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर देवदास, दाग: द फायर या सिनेमांमध्येही ती झळकली आहे. नेहाने हिंदीसोबतच मराठी सिनेमा, मालिकांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :नेहा पेंडसेसेलिब्रिटीटेलिव्हिजनबॉलिवूड