मृण्मयी बनली स्पॉटबॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 22:46 IST
नटसम्राट, कट्यार काळजात घुसली अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये अभिनय साकारणारी मृण्मयी देखपांडे चक्क स्पॉटबॉय बनली ...
मृण्मयी बनली स्पॉटबॉय
नटसम्राट, कट्यार काळजात घुसली अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये अभिनय साकारणारी मृण्मयी देखपांडे चक्क स्पॉटबॉय बनली आहे. तिने कोणत्या चित्रपटातील रोलसाठी स्पॉटबॉयची भुमिका केली असेल असे जर वाटत असेल तर तस नाहीये. ती खरोखरीच स्पॉटबॉय झाली आहे. मृण्मयीचा आगामी चित्रपट अनुराग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटात मृण्मयी प्रमुख भुमिकेत जरी दिसत असली तरी तिने बॅकस्टेज स्पॉटबॉयचे काम केले असल्याचे तिने स्वत:च सीएनएक्सशी बोलताना सांगितले आहे. प्रत्येक कलाकारालाच त्यांच्या चित्रपटांविषयी प्रेम असते. आपला चित्रपट दर्जेदार व्हाया यासाठी कलाकार सडेतोड मेहनत घेताना दिसतात. अशीच मेहनत मृण्मयीने अनुराग साठी घेतली आहे. ती म्हणते मी या चित्रपटासाठी सर्व कामे केली आहेत. अभिनया बरोबरच कॉश्च्युम पाहणे, कपड्यांना इस्त्री करणे अशी सर्व काही स्पॉटबॉयसारखीच कामे केली आहे. मृण्मयीच्या या मेहनतीचे फळ तीला प्रेक्षकांकडुनच मिळणार आहे. ग्लॅमरमध्ये सतत वावरणाºया या अभिनेत्री चित्रपटांसाठी स्पॉटबॉय देखील होऊ शकतात हे मृण्मयीकडे पाहुनच समजते.