Join us
Daily Top 2Weekly Top 5

​क्योंकी साँस भी कभी बहू थी फेम रोनित रॉय आणि स्मृती इराणीची झाली अचानक भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 10:05 IST

क्योंकी साँस भी कभी बहू थी ही मालिका संपून आज अनेक वर्षं झाली असली तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या ...

क्योंकी साँस भी कभी बहू थी ही मालिका संपून आज अनेक वर्षं झाली असली तरी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतात. मिहिर आणि तुलसी या मालिकेतील दोन प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना प्रचंड आवडायच्या. या मालिकेत मिहिरची व्यक्तिरेखा रोनित रॉय तर तुलसीची व्यक्तिरेखा स्मृती इराणीने साकारली होती. या मालिकेसाठी त्या दोघांना अनेक पुरस्कारदेखील मिळालेले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक गाजलेल्या मालिकांमध्ये क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. रोनित आजही अनेक चित्रपट, मालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आज इतक्या वर्षांत तो छोट्या पडद्यावरचे एक महत्त्वाचे नाव बनला आहे. पण स्मृती इराणीने अभिनयक्षेत्र सोडून अनेक वर्षं झाले आहे. स्मृती काही वर्षांपूर्वी राजकारणाकडे वळली आणि आज ती केंद्रिय मंत्री आहे.स्मृती आज अभिनयक्षेत्रापासून दूर असल्याने तिची तिच्या जुन्या सहकलाकारांशी भेट खूपच कमी होते. पण विमानातून प्रवास करताना नुकतीच तिची आणि रोनितची भेट झाली आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. रोनितने स्मृतीसोबतचा विमानातील फोटो पोस्ट करून स्मृती इराणीला भेटून खूप आनंद झाला असे ट्वीट केले आहे.स्मृती आणि रोनित ही एकेकाळची प्रसिद्ध जोडी होती. त्यांना छोट्या पडद्यावरचे फेमस कपल मानले जात असे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर आपल्या या आवडत्या जोडीला पुन्हा पाहून त्यांच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. रोनितने ट्वीट केल्यापासून त्याच्या ट्वीटला अनेक लाइक्स मिळत असून अनेकजण त्यावर कमेंट करत आहेत.