Join us  

BB15: 'Bijlee Bijlee' गाण्यावर सलमान खानसह पलक तिवारीने लावले ठुमके,पाहून आई श्वेता तिवारी भारावली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 4:27 PM

Bigg Boss 15 शोमध्ये पलक तिवारीने सलमानसोबत (Salman Khan) केलेला डान्स यावेळी सगळ्यांचे आकर्षण ठरला. या डान्सचा व्हिडिओही सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून नेटीझन्सही पसंती देत आहेत.

टीव्हीचा सगळ्यात वादग्रस्त समजला जाणारा शो 'बिग बॉस 15'च्या (Bigg Boss 15) वीकेंड का वार एपिसोडमध्ये २०२२ नवीन वर्षाचे दणक्यात सेलिब्रेशन करण्यात आले. या खास भागात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सगळ्यात पलक तिवारीच्या (Palak Tiwari) डान्सने तर उपस्थितांची मनं जिंकली, पलकच्या डान्सचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे तिने सलमान खानसोबत तिने डान्स  केला. पलक तिच्या 'बिजली बिजली' या गाण्याच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आली होती.  पलक तिवारीने सलमानसोबत (Salman Khan) केलेला डान्स यावेळी सगळ्यांचे आकर्षण ठरला. या डान्सचा व्हिडिओही सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून नेटीझन्सही पसंती देत आहेत.

मुलगी पलक तिवारीला सलमानसोबतच्या डान्स करताना पाहून श्वेता तिवारीही भारावली तसेच पलक तिवारीने सलमानकडे तिची एक इच्छा व्यक्त केली. तिचा आवडता चित्रपट 'अंदाज अपना अपना' आहे. एकदा 'ऊईईई... माँ' बोलून तुझ्या चित्रपटाचे डायलॉग बोलण्याची विनंती केली.. पलकची इच्छा पूर्ण करत सलमाननेही हा डायलॉग बोलून दाखवला. हाच  व्हिडिओ शेअर करत श्वेता तिवारीने कॅप्शनमध्ये ," ऊईईई... माँ हा शो बघण्यासाठी मी आणखी वाट नाही पाहू शकत असे म्हटले आहे.

पलक तिवारी चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहे. तिचे गाणे हिट झाल्यापासून तिची सर्वत्र चर्चा होत आहे. पलक नेहमीच तिच्या लूकने चाहत्यांना प्रभावित करताना दिसली आहे. 'बिग बॉस 15' मध्येही यावेळी पलक तिवारी जांभळ्या रंगाच्या चमकदार ड्रेसमध्ये दिसली होती, तिने मोकळे सोडलेले केस आणि न्यूड मेकअप केला होता. थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये पलक खूपच सुंदर दिसत होती.

पलक लवकरच अरबाज खान आणि विवेक ओबेरॉयसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ती 'रोजीः द सैफ्रन चैप्टर' या चित्रपटात दिसणार आहे. पलकने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. विवेक चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळत आहे. पलकचा हा डेब्यू चित्रपट आहे. पलकने इंडस्ट्रीत स्वतःचा वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. श्वेती तिवारी सुरुवातीपासूनच टीव्ही इंडस्ट्रीचा चेहरा आहे, लोकप्रियत आहे. त्यामुळे पलकसुद्धा आईच्याच पावलावर पाऊट टाकत इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी मेहनत घेत आहे. 

टॅग्स :सलमान खानबिग बॉस