Join us

'थप्पड' प्रकरणानंतर आईला पाहताच विशाल पांडे ढसाढसा रडला, बाबांनी अरमान मलिकला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 12:34 IST

अरमान मलिकने कानाखाली मारल्यानंतर विशालच्या आई-बाबांची घरात एन्ट्री झाली. त्यावेळी बाबांनी सर्वांसमोर अरमानला चांगलंच झापलं (armaan malik, bigg boss ott 3)

सध्या Bigg Boss OTT 3 विविध कारणांनी चर्चेत आहे. Bigg Boss OTT 3 मध्ये गेल्या काही आठवड्यात एक प्रकरण चांगलंच गाजलं. ते म्हणजे अरमान मलिकने विशाल पांडेला लगावलेली कानाखाली. विशालने अरमानची दुसरी पत्नी कृतिकाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल अरमानने सर्वांसमोर विशालला जोरात लगावली आणि त्याला ढकललं. हे प्रकरण खूपच गाजलं. आता या प्रकरणानंतर विशाल पांडेच्या आई-बाबांची Bigg Boss OTT 3 मध्ये एन्ट्री झालीय. 

आई-बाबांची एन्ट्री होताच विशाल भावुक

Bigg Boss OTT 3 चा नवीन प्रोमो रिलीज झालाय. यात होस्ट अनिल कपूर विशाल पांडेच्या आई-बाबांचं स्वागत  करतात. विशालचे बाबा पत्नीचा हात हातात धरुन मंचावर येतात. आई-बाबांना पाहताच विशाल ढसाढसा रडतो. आईच्या डोळ्यातही पाणी येतं. आई-बाबा त्याला रडू नको म्हणून सांगतात. याशिवाय तू काहीही चुकीचं केलं नाही, असं म्हणत त्याला धीरही देतात. विशालचे बाबा पुढे अरमानला चांगलंच सुनावतात.

विशालच्या बाबांनी अरमानला झापलं

Bigg Boss OTT 3 मध्ये येताच विशालच्या बाबांनी अरमानला चांगलंच झापलं. ते म्हणाले, "आम्ही आजपर्यंत आमच्या मुलाला कधी टच केलं नाही. त्यामुळे आमच्या मुलाला मारण्याचा अधिकार कोणाला नाही. तु्म्हाला जर विशालच्या चारित्र्याबद्दल संशय होता तर बाहेर येऊन विचारायचं ना". विशालच्या बाबांचं बोलणं ऐकताच अरमान म्हणाला, "मी आधी कन्फर्म केलं मगच..." पुढे अरमानला मध्येच थांबवत बाबा म्हणाले, "मला तुमच्याशी काही बोलायचं नाही." हे ऐकताच अरमानचा चेहरा पडतो. Bigg Boss OTT 3 चा हा भाग आज रात्री बघायला मिळणार आहे 

टॅग्स :बिग बॉसअनिल कपूर