Join us

बाझीगरने केली कोबराची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 12:21 IST

रिश्तो का सौदागर बाझीगर या मालिकेचे चित्रीकरण सध्या गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. या मालिकेच्या सेटवर एक कोबरा ...

रिश्तो का सौदागर बाझीगर या मालिकेचे चित्रीकरण सध्या गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. या मालिकेच्या सेटवर एक कोबरा मालिकेच्या टीमला मिळाला. हा कोबरा या मालिकेच्या टीमने एका एनजीओकडे सोपावला. याविषयी वत्सल सेठ सांगतो, एक कोबरा माझ्या व्हॅनिटी व्हॅनजवळ तीन दिवसांपासून होता. त्याची सुटका करणे हे गरजेचे असल्याने मी एका एनजीओशी संपर्क साधला. माझे बोलणे झाल्यावर त्यांनी लगेचच त्यांचा सर्पमित्राला पाठवले. त्याने कोबऱ्याला व्यवस्थितपणे पकडून नेले. तो कोबरा अतिशय अशक्त असून त्याच्यावर उपचार करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळेच त्याला एनजीओच्या मंडळींकडे देण्याचे मी ठरवले. कोबराची सुटका केल्यानंतरचे फोटो इशिता दत्ताने सोशल नेटवर्किंगवर शेअर केले आहेत.