Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाळूमामाच्या नावानं चांगभलं : पाटलाला बाळूमामा देणार मृत्युदंडाची शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 18:38 IST

बाळूमामांच्या अनेकदा सांगण्यावरूनही पाटील ही लबाडी मान्य करत नाही

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत आजवर सगळ्यांवर प्रेम करणारे, प्राण्यांवर विशेष माया  दाखवणारे, गरजू व्यक्ति, गरिबांच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारे बाळूमामा पहिले आहेत, मात्र या वेळी बाळूमामांचा रुद्र अवतार बाळूमामांच्या भक्तांना पहायला मिळणार आहे. मुजोरवृत्तीच्या पाटलाला बाळूमामा देणार आहेत मृत्युदंडाची शिक्षा... खोटेपणा करून, इतरांना त्रास देणार्‍या पाटलाला बाळूमामा धडा शिकवणार आहेत...मालिकेमध्ये आजवर बाळूमामांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटना  नाट्यपूर्णरित्या मांडल्या गेल्या आहेत...अशीच एक घटना ह्या महाएपिसोडच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे...मेंढ्यांना चरण्यासाठी बाळूमामांचा तळ सध्या फिरतीवर आहे...अशाच एका गावात असताना, गड्यांच्या दुर्लक्षाने मेंढया गावातल्या पाटलांच्या शेतात घुसतात… याचा राग म्हणून पाटील गड्यांच्या अंगावरील बाळूमामांनी दिलेल्या घोंगड्या काढून घेतात... घरच्यांच्या सांगण्यावरून बाळूमामांच्या घोंगड्या परत देण्यासाठी पाटील तयार होतो, परंतु ४ ऐवजी ३ घोंडग्या परत करतो...त्याची ही लबाडी बाळूमामांपासून लपत नाही...

बाळूमामांच्या अनेकदा सांगण्यावरूनही पाटील ही लबाडी मान्य करत नाही...ह्याच खोटेपणाची शिक्षा म्हणूनच बाळूमामा पाटलाला मृत्यदंडाची शिक्षा देतात...येत्या सात दिवसात जीव जाईल असा शाप बाळूमामा पाटलाला देतात...बाळूमामांचा हा राग पाटलाला भोवणार का ? की अखेरच्या क्षणी पाटलाला त्याची चूक लक्षात येऊन तो बाळूमामांना शरण जाणार ? हे बघणे रंजक असणार आहे.   बाळूमामांनी दिलेल्या शापामुळे पाटील मृत्यश्य्येवर आहे, बाळूमामांनी आजवर सांगितलेले भाकीत कधीच खोटे ठरले नाही... पाटलाचे नक्की काय होईल ?

टॅग्स :कलर्स मराठी