मालिनीने ‘यारो का टशन’, ‘बालिका वधू’, ‘साथिया’, ‘कुमकुम’, ‘देखो मगर प्यार से’ आणि ‘सिंदूर’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. आई झाल्यामुळे मालिनीने आता त्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये स्थान मिळविले, ज्या नुकत्याच आई झाल्या आहेत. यामध्ये ‘दीया और बाती हम’मधील दीपिका सिंग, श्वेता तिवारी, तीजे सिंधू, दिशा वकानी आणि सौम्या सेठ या अभिनेत्रींची नावे आहेत. आता यामध्ये मालिनी कपूर हे नावदेखील जोडले गेले आहे. काही दिवसांपूर्वीच मालिनीने तिचे काही फोटोज् शेअर केले होते. त्यामध्ये ती गर्भवती असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.
२०१४ मध्ये एका समारंभात मालिनीने अजय शर्मासोबत विवाह केला होता. अजयदेखील एक अभिनेता असून, मालिनीशी त्याची भेट ‘लव यू जिंदगी’च्या सेटवर झाली होती. काही दिवसांपूर्वीच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अभिनेत्री दिशा वकानी आई बनल्याची बातमी समोर आली होती. दिशाने एका चिमुकलीला जन्म दिला. दरम्यान, मुलाच्या आगमनामुळे कपूर आणि शर्मा परिवारात आनंदाचे वातावरण आहे.