Join us  

बालक पालकमधील डॉली आता दिसते प्रचंड ग्लॅमरस, फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 10:59 AM

बालक पालक या चित्रपटात शाश्वतीने डॉली ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाच्यावेळी शाश्वती केवळ नववीत होती.

ठळक मुद्देशाश्वती पिंपळीकर सध्या प्रेक्षकांना सिंधू या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत ती नेहमीच पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत असली तरी ती तिच्या खाजगी आयुष्यात नेहमीच मॉडर्न कपड्यांमध्ये दिसते.

बालक पालक या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधवने केले होते. अतिशय संवेदनशील अशा विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटात सई ताम्हणकर, प्रथमेश परब, मदन देवधर आणि शाश्वती पिंपळीकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील सगळ्यांच्याच भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात शाश्वतीने डॉली ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाच्यावेळी शाश्वती केवळ नववीत होती. पण आता शाश्वती चांगलीच मोठी झाली असून लवकरच एका मालिकेत झळकणार आहे.

शाश्वतीचा जन्म 16 नोव्हेंबर 1996 ला पुण्यात झाला. तिने तिचे शिक्षण पूर्ण केले असून ती आता पुन्हा एकदा ग्लॅमरस दुनियेकडे वळली आहे. शाश्वती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियाच्या साईटवर आपल्याला तिचे अनेक हॉट आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळत आहेत. शाश्वती खूपच छान दिसत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

शाश्वती पिंपळीकरने रायगडला जेव्हा जाग येते या नाटकाद्वारे त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने बंध रेशमाचे या मालिकेत काम केले. या मालिकेत काही महिने काम केल्यानंतर तिला बालक पालक या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर तिने शेजारी शेजारी पक्के शेजारी, चाहूल या चित्रपटात काम केले. तसेच देहभान नाटकात देखील ती झळकली होती.

मधू इथे चंद्र तिथे, हेडलाईन यांसारख्या काही चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले. ती एका चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक खूप चांगली डान्सर आहे. तिने कथ्थकचे धडे गिरवले असून ती सध्या प्रेक्षकांना सिंधू या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत ती नेहमीच पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत असली तरी ती तिच्या खाजगी आयुष्यात नेहमीच मॉडर्न कपड्यांमध्ये दिसते. तिच्या ग्लॅमरस लूकची नेहमीच चर्चा केली जाते. 

टॅग्स :रवी जाधव