Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘कुमकुम भाग्य’च्या प्रग्यासाठी बॅड टाईम कमिंग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 11:45 IST

'कुमकुम भाग्य' या मालिकेतील आलिया फेम अभिनेत्री शिखा सिंगची शोमध्ये पुन्हा एकदा एंट्री होणार आहे.. या मालिकेतील तिच्या पात्राला ...

'कुमकुम भाग्य' या मालिकेतील आलिया फेम अभिनेत्री शिखा सिंगची शोमध्ये पुन्हा एकदा एंट्री होणार आहे.. या मालिकेतील तिच्या पात्राला ज्या पद्धतीने दाखवण्यात येतं होतं ते पटलं नसल्यानं शिखा सिंगनं मालिका सोडली होती. लग्नासाठी शिखानं मे महिन्यात ब्रेक घेतला होता. त्या काळात मालिकेच्या निर्मात्यांनी निखील (निखील आर्य), तनु (लीना जुमानी) आणि प्रग्या (श्रीती झा) यांना केंद्रस्थानी ठेवून मालिकेचं कथानक पुढे नेलं. या तिकडीच्या अवतीभोवती मालिकेचं कथानक फिरु लागलं. ज्यावेळी लग्नानंतर शिखा परतली त्यावेळी तिला हिच गोष्ट खटकली. ती साकारत असलेल्या आलिया या पात्राला फारसा वाव नसल्याचं समजल्यानं तिनं मालिका सोडली. मात्र आता निर्मात्यांनी या मालिकेत ट्विस्ट आणायचं ठरवलंय. त्यामुळंच ते पुन्हा एकदा मालिकेत आलियाची एंट्री करणार आहेत. त्यासाठी त्यांनी शिखा सिंग हिच्याशीही चर्चा केली असून कमबॅकसाठी तीही सज्ज आहे.त्यामुळं मालिकेत प्रग्याच्या अडचणीत आगामी काळात वाढ होणार असंच दिसतंय.