Join us
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीच्या भावविश्वावर आधारित आटपाडी नाईट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 07:00 IST

मराठी प्रेक्षक वर्ग चोखंदळ झाला आहे, त्यासाठी दिग्दर्शक सुध्दा अनेक वेगळ््या धाटणीचे विषय प्रेक्षकांसमोर ठेवत आहेत, असाच एक धाडसी ...

मराठी प्रेक्षक वर्ग चोखंदळ झाला आहे, त्यासाठी दिग्दर्शक सुध्दा अनेक वेगळ््या धाटणीचे विषय प्रेक्षकांसमोर ठेवत आहेत, असाच एक धाडसी प्रयोग व वेगळा विषय घेऊन नव्या धाटणीचे दिग्दर्शक नितीन विजय सुपेकर यांनी पहिल्यांदाच बेडरुमधील पती-पत्नीच्या  भाव विश्वावर भाष्य करणारे कथानक आटपाडी नाईट्स या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकासमोर आणले आहे. सिंधविजय स्टुडीओची प्रथम प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती नेहा सुपेकर, गजानन शिंदे, अमर परदेशी आणि विनोद राजे यांनी केली आहे. सिनेमाचे संगीत सिध्दार्थ दुकटे, विजय गवंडे यांनी तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे. गीतलेखन कमलेश कुलकर्णी, नारायण पुरी यांनी केले आहे. तसेच सिनेमाची सिनेमॅटोग्राफी दिवाकर नागराज व वीरधवल पाटील यांनी तर संकलनाची बाजू नीलेश गावंड यांनी सांभाळली आहे, तर कार्यकारी निर्माते म्हणून विनायक पाष्टे यांनी काम पाहिले आहे. असा हा दारामागच्या चटकदार गोष्टी अशी आकर्षक टॅगलाईन असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.