Join us

​थपकी प्यार की घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 11:36 IST

मालिका सुरू ठेवणे अथवा ती बंद करणे हे सर्वस्वी टिआरपीवर अवलंबून असते. टिआरपीचे गणित बिघडले की कार्यक्रमाला वाहिनीकडून रामराम ...

मालिका सुरू ठेवणे अथवा ती बंद करणे हे सर्वस्वी टिआरपीवर अवलंबून असते. टिआरपीचे गणित बिघडले की कार्यक्रमाला वाहिनीकडून रामराम ठोकला जातो. आता असेच काहीसे थपकी प्यार की या मालिकेच्यासोबत घडले आहे. या मालिकेचा टिआरपी नसल्याने या मालिकेला निरोप देण्यात येणार आहे.थपकी प्यार की ही मालिका 2015मध्ये सुरू झाली होती. सुरुवातीच्या काळात या मालिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती होती. पण नंतरच्या काळात या मालिकेचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. या मालिकेचा टिआरपी सुधारण्यासाठी अनेकवेळा मालिकेच्या कथानकात अनेक बदलदेखील करण्यात आले होते. पण कोणत्याही गोष्टीचा टिआरपीवर परिणाम झालेला नाही आणि त्यामुळे आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जिज्ञासा सिंगला या मालिकेच्या सेटवर काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती ही गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती. त्यानंतर या मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका मनिष गोपलानी मालिकेत परतला होता. या सगळ्यामुळे ही मालिका गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. पण तरीही या चर्चेचादेखील मालिकेच्या टिआरपीवर काहीही परिणाम झाला नाही. आता ही मालिका पुढील महिन्यात प्रेक्षकांना रामराम ठोकणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेचा टिआरपी वाढण्यासाठी या मालिकेच्या कथानकाला अनेक वळणे देण्यात आली होती. तसेच मालिका प्रक्षेपित करण्याचा वेळदेखील बदलण्यात आला होता. पण त्याचा काहीही परिणाम टिआरपीवर झाला नाही. त्यामुळे आता प्रेक्षकांची लाडकी थपकी म्हणजेच जिज्ञासा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण काहीच दिवसांत आटोपले जाणार आहे.