Join us
Daily Top 2Weekly Top 5

यारो का टशन ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 16:04 IST

एका यंत्रमानवाच्या आयुष्यावर आधारित असलेला यारो का टशन हा कार्यक्रम गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची ...

एका यंत्रमानवाच्या आयुष्यावर आधारित असलेला यारो का टशन हा कार्यक्रम गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची पटकथा ही वेगळी असल्याने या मालिकेची सुरुवातीला चांगलीच चर्चा होती. या मालिकेने चांगला टिआरपीदेखील मिळवला होता. पण त्यानंतर या मालिकेला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका टिआरपीच्या रेसमध्येदेखील मागे आहे आणि त्यामुळे आता ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यारो का टशन या मालिकेत अनिद्ध दवे आणि सुरभी आहुजा प्रमुख भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेत ते नायक-नायिकेच्या भूमिकेत असून ते खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी आहेत. या मालिकेतही त्यांचे लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. या मालिकेने नुकतेच 200 भाग पूर्ण केले असून यामुळे या मालिकेची संपूर्ण टीम चांगलीच आनंदीत होती. पण त्याचवेळी या मालिकेच्या टीमला एक वाईट बातमी कळली. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे सब वाहिनीकडून मालिकेच्या टीमला सांगण्यात आले. सब वाहिनीवर अनेक नवीन कार्यक्रम येणार असल्याने काही जुन्या कार्यक्रमांना निरोप देण्याचे सब वाहिनीकडून ठरले आहे. तसेच वाहिनीवरील अनेक मालिकांच्या वेळातदेखील बदल करण्यात येणार आहे.सजन रे झुठ मत बोलो हा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी सब वाहिनीवर दाखवण्यात आला होता. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा सजन रे फिर झुठ मत बोलो हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेतही पहिल्या सिझनप्रमाणे टिकू तलसानियाची प्रमुख भूमिका असणार आहे.