चंद्र-नंदिनीच्या विवाहास शास्त्रीय नर्तकांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 19:53 IST
‘चंद्र नंदिनी’ या ऐतिहासिक मालिकेत चंद्रगुप्त मौर्य (रजत टोकस) आणि राजकन्या नंदिनी (श्वेता बसू-प्रसाद) यांचा विवाह लवकरच पार पडणार ...
चंद्र-नंदिनीच्या विवाहास शास्त्रीय नर्तकांची हजेरी
‘चंद्र नंदिनी’ या ऐतिहासिक मालिकेत चंद्रगुप्त मौर्य (रजत टोकस) आणि राजकन्या नंदिनी (श्वेता बसू-प्रसाद) यांचा विवाह लवकरच पार पडणार आहे. विवाहास मगधमधले सर्व शास्त्रीय नर्तक आकर्षणाचा विषय ठरणार आहेत. निर्माती एकता कपूरने या मौर्यकालीन शाही विवाहाच्या भव्यतेची कुठलीही कसर ठेवलेली नाही. या शाही विवाहाचे हळद, संगीत आणि प्रत्यक्ष विवाह सोहळा असे तीन प्रमुख भाग असतील. यातील संगीताच्या कार्यक्रमासाठी थेट मगधहून (जेथे मौर्य राजघराण्याची स्थापना झाली) आणलेल्या शास्त्रीय नर्तकांना या सोहळ्यात समाविष्ट करून घेणार आहेत. सूत्रानुसार, प्रेक्षकांना या विवाहाविषयी उत्सुकता वाढावी यासाठी निर्मात्यांनी काही योजना आखल्या आहेत. चंद्रगुप्त आणि नंदिनी यांच्या विवाहानंतरच या दोघांच्या जीवनाचा आणि मालिकेचाही खºया अर्थाने प्रारंभ होईल. या सोहळ्यात शाही संगीताचा कार्यक्रम होणार असून, त्यात नर्तकांचा सहभाग महत्त्वाचा असेल. ते काही पारंपारिक नृत्य सादर करतील. त्यांचे कपडेही मौर्यकालीन असतील.