Join us

अभिनेता अरुण कदमच्या मुलीचं थाटात पार पडला लग्नसोहळा, फोटो व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 16:32 IST

Arun Kadam मुलीसोबत गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑगस्ट महिन्यातच सुकन्याचा साखरपुडा झाला होता.

सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. इतकंच काय तर सेलिब्रेटींचे मुला मुलींची लग्नसुद्धा थाटात पार पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच अभिनेता अरुण कदमच्या लेकीचाही विवाहसोहळा पार पडला. अरुण कदम यांच्या मुलीचं नाव सुकन्या कदम आहे.सुकन्या कमर्शिअल आर्टिस्ट असण्यासोबत उत्तम ग्राफिक डिझायनर आहे.दिसायलाही ती फार सुंदर आहे. लग्नातल्या फोटोमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. सुकन्याचं बॉयफ्रेंड सागर पावळेसोबत तिचं शुभमंगल नुकतंच पार पडलं.

लग्नाआधीच्या कार्यक्रमादरम्यानचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हळदीच्या कार्यक्रमातला डान्स करतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. अरुण कदम मुलीसोबत गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑगस्ट महिन्यातच सुकन्याचा साखरपुडा झाला होता. 

 

त्यानंतर 25 नोव्हेंबरलाच सुकन्याने बॉयफ्रेंड सागर पावळेसोबत रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते. आता मोठ्या थाटामाटात दोघांचे पारंपरिक पद्धतीने लग्न पार पडले.  या फोटोंमध्ये नववधू सुकन्या कदमचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओत पाहायला मिळतेय.

लग्नसोहळ्यात मोजकेच मित्रमंडळींसह नातेवाईकांनी हजेरी लावली होती. सुकन्या कदमच्या नवीन आयुष्याच्या वाटचालीसाठी चाहतेही तिला भरभरुन लाईक्स कमेंट्स करत नवदाम्पत्याला नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छांचा वर्षाव  करताना दिसत आहेत.