तुम्हाला कदाचित आठवत असेल की, जेव्हा अर्शी बिग बॉसच्या घरात होती तेव्हा तिच्याविरोधात सुरू असलेल्या कोर्ट केससवरून चर्चा रंगली होती. मधल्या काळात तर अशीही बातमी आली होती की, तिला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. आता अर्शीने घराबाहेर पडताच सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, अर्शी खानला कोर्ट केसेसमुळेच घराबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. वास्तविक अर्शीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, या सर्व बातम्या निव्वळ अफवा आहेत. माझ्यावर कुठल्याही प्रकारचा कलंक नाही. मला कळत नाही की, अशाप्रकारच्या बातम्या का पसरविल्या जात आहेत.
अर्शीने बॉलिवूड स्पाय नावाच्या एका यू-ट्यूब चॅनेलशी बोलताना म्हटले की, ‘मी माझ्या सर्व चाहत्यांना हे सांगू इच्छिते की माझ्यावर अशाप्रकारचा कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. कुठल्याही प्रकरणात माझी कोर्ट हिअरिंग नव्हती. एकूणच माझ्यावर कुठल्याही प्रकारचे न्यायालयीन खटले सुरू नाहीत. हे खरं आहे की, माझ्यावर काही गुन्हे दाखल होते, परंतु आता ते सर्व क्लियर झाले आहेत. खरं तर जेव्हा एवढ्या मोठ्या शोमध्ये तुम्ही सहभागी होता, तेव्हाच तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो की, तुमच्यावर कुठला गुन्हा तर दाखल नाही ना? कारण शोच्या मेकर्सलाही असे वाटत असते की, हा स्पर्धक चांगला खेळला अन् शोच्या अखेरपर्यंत गेल्यास त्याचा शोच्या टीआरपीला फायदा होईल.
एका शब्दात सांगायचे झाल्यास माझ्यावर कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. मला कधीच अटक झाली नसून, माझ्याविरोधात अटक वॉरंटही काढण्यात आलेले नाहीत. मी पूर्णत: क्लिन आहे. परंतु मला या गोष्टींचे दु:ख वाटत आहे की, अशाप्रकारच्या अफवा अखेर का पसरविल्या जात आहेत?