Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्शी खानविरोधात न्यायालयाने काढले अटक वॉरंट; कुठल्याही क्षणी होणार अटक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 17:20 IST

बिग बॉस सीजन ११ मध्ये सहभागी असलेली कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन अर्शी खान हिला कोणत्याही क्षणी शोच्या बाहेर काढले जाण्याची शक्यता ...

बिग बॉस सीजन ११ मध्ये सहभागी असलेली कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन अर्शी खान हिला कोणत्याही क्षणी शोच्या बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे. अर्शीला शोमध्ये बाहेर काढण्याचे कारण नॉमिनेशन किंवा कमी वोट नसून, तिच्या विरोधात काढण्यात आलेले अटक वॉरंट आहे. रिपोर्टनुसार, पंजाबच्या जालंधर न्यायालयाने अर्शी खानच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. त्यामुळे तिला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस केव्हाही बिग बॉसचे घर गाठू शकतात. दरम्यान, बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच पोलीस येत आहेत, असे नाही. तर यापूर्वीदेखील स्वामी ओम याला घेण्यासाठी पोलीस बिग बॉसच्या लोणावळा येथील घरी पोहोचले होते. दरम्यान, अर्शी खानला अटक अटळ असल्याचे बोलले जात आहे. जालंधर न्यायालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शी विरोधातील अटक वॉरंट रद्द करणे आता अशक्य आहे. कारण न्यायालयाने पोलिसांना स्पष्ट शब्दात आदेश दिले की, अर्शी खानला कुठल्याही परिस्थितीत अटक केली जावी. जालंधर न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाºयांनी पोलिसांना अशाप्रकारचे आदेश दिले आहेत. हे वॉरंट अर्शी खानवर असलेल्या एका जुन्या प्रकरणाविषयी आहे. या प्रकरणावर गेल्या तीन महिन्यांपासून सुनावणी सुरू असून, अर्शी न्यायालयात उपस्थित राहात नसल्यानेच तिच्या विरोधात हे वॉरंट बजावण्यात आले आहे. जालंधर येथे राहणाºया एका वकिलाने अर्शी खानच्या विरोधात लोकांच्या भावना दुखावण्यावरून एक गुन्हा दाखल केला होता. अर्शीवर आरोप आहे की, तिने सेमी न्यूड बॉडीवर भारत आणि पाकिस्तानचा झेंडा बनवून दोन्ही समुदायांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अर्शी खानच्या वकिलांच्या मते, ती गेल्या १ आॅक्टोबरपासून बिग बॉसच्या घरात आहे. त्यामुळे ती न्यायालयात उपस्थित राहू शकली नाही. पंजाब पोलिसांच्या सूत्रानुसार, अर्शी खानच्या विरोधात कुठलीही अ‍ॅक्शन घेण्याकरिता आम्ही १५ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करणार आहोत. त्याचबरोबर न्यायालयाच्या निर्देशांचे पालनही करणार आहोत.