शक्ती घेणार अर्जुनची जागा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 14:09 IST
नागिन या मालिकेचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. या मालिकेच्या टिआरपीचा विचार करून पहिले पर्व संपण्याच्याआधीच दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली ...
शक्ती घेणार अर्जुनची जागा?
नागिन या मालिकेचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. या मालिकेच्या टिआरपीचा विचार करून पहिले पर्व संपण्याच्याआधीच दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली होती. या दुसऱया पर्वात काय करणार याची लोकांना उत्सुकता लागलेली आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वात अर्जुन बिजलानी प्रमुख भूमिकेत झळकला होता. पण दुसऱ्या पर्वात अर्जुनला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याची जागा शक्ती अरोरा घेणार असल्याची चर्चा आहे. शक्तीने मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. नागिनचा दुसरा सिझन ऑक्टोबरच्या जवळपास सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.