Join us

अरिना डेचा 'मुस्कान'ला अलविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 12:54 IST

अरिना डे आता 'मुस्कान' ह्या शो ला अलविदा करत आहे. तिचा प्रत्येक अंदाज विशेषतः तरुणाईला भावला. अरिनाचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत.

अत्यंत सरळ साधी आणि सोज्जवळ भूमिका साकारणारी अभिनेत्री  अरिना डे आता 'मुस्कान' ह्या शो ला अलविदा करत आहे. तिचा प्रत्येक अंदाज विशेषतः तरुणाईला भावला. अरिनाचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत. आपल्या भूमिकेने अरिनाने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. आता साचेबद्ध काम करण्यात रस नसून वेगळे काहीतरी करण्याच्या प्रयत्नात  अरिना आहे. म्हणून आता हा शो मुस्कान आणि रौनक यांच्यावर लक्ष केंद्रित करत असून त्यामुळे आता आरतीची भूमिका संपुष्टात येणार आहे.

अरिनाने मुस्कानमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आणि आता नव्या प्रोजेक्ट्‌सवर काम करण्यासाठी ती उत्सुक आहे. अरिना डे ची एक्झिट मुस्कानच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळण असेल. ह्या शोचे निर्माते मुस्कान आणि रौनक यांच्यातील नाते विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि त्यामुळे आरतीला ह्या शोमध्ये काहीच वाव उरला नाहीये.

अरिना डे म्हणाली, “मुस्कानचा हा प्रवास माझ्यासाठी अतिशय खास राहिला असून त्यामुळे ह्या इंडस्ट्रीमधील कलाकार बनण्यासाठी मला खूप काही शिकायला मिळाले आहे. ६ महिने मी ह्या मालिकेशी जोडले गेले होते. हा गुडबाय खरंच कठीण असणार आहे. मी माझ्या आगामी प्रोजेक्ट्‌ससाठी तयारी सुरू केली असून लवकरच दुसऱ्या सेटवर दिसून येईन. मुस्कानला माझ्या हृदयात खास स्थान असून माझ्या पहिल्या टेलिव्हिजन परिवाराला तुम्ही मला भेट देताना पुन्हापुन्हा पाहाल. मी मुस्कानच्या टीमला आगामी भागांसाठी शुभेच्छा देते आणि त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी उत्सुक आहे.”