Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सेटवरचं वातावरण..'; 'अप्पी आमची कलेक्टर'फेम छकुलीने केली सेटवरची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 18:29 IST

Swara patil: अप्पी आमची कलेक्टरमध्ये स्वरा पाटील ही छकुलीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेविषयी आणि मालिकेतील कलाकारांविषयी पहिल्यांदाच तिने भाष्य केलं.

छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेत. त्यामुळे हे कलाकार कायम चर्चेत येत असतात. मात्र,यावेळी मालिकेतील एका चिमुकल्या बालकलाकाराची चर्चा होताना दिसते. अप्पीची पीए छकुली हिने या मालिकेविषयी तिला काय वाटतं हे सांगितलं आहे.

अप्पी आमची कलेक्टरमध्ये स्वरा पाटील ही छकुलीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेविषयी आणि मालिकेतील कलाकारांविषयी पहिल्यांदाच तिने भाष्य केलं.

"ह्या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर ही मालिका छान आहे. मला मज्जा येते या मालिकेत काम करताना.  तुम्ही आता मागील भागात पहिलाच असेल की अप्पी दीदी आता कलेक्टर झाली आहे. तर तिची पी ए म्हणून वावरताना एकदम छान वाटते. ही माझी झी मराठी सोबत दुसरी मालिका आहे. याआधी मी 'देवमाणूस' या मालिकेत काम केलं आहे", असं स्वराने सांगितलं.

पुढे ती म्हणते, "मी या मालिकेत छकुली नावाची भूमिका साकारत आहे आणि ती अप्पी दीदी ची पी.ए आहे. गावातल्या प्रत्येक गोष्टी तिला माहित आहेत आणि आता अप्पी दीदी कलेक्टर झाल्यामुळे आता गावातील सगळी काम मार्गी लागणार त्यामुळे एकदम  भारी वाटतंय. मला सर्वांसोबत काम करताना खूप बरं वाटते. सेटवरचं वातावरण सुद्धा छान असतं. मला प्रत्येकाकडून काही ना काही नवीन शिकायला मिळतं."

दरम्यान, 'देवमाणूस' या मालिकेतही स्वराने काम केलं होतं. तिच्या या कामाचंही प्रेक्षकांमध्ये कमालीचं कौतुक झालं होतं. त्यानंतर आता ती अप्पी आमची कलेक्टरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी