Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का आयुषची '३६ गुणी जोडी'!, येतेय लवकरच भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 17:51 IST

'३६ गुणी जोडी' मालिकेच्या निमित्ताने अनुष्का सरकटे आणि आयुष संजीव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवीन मालिका येत आहे. या मालिकेचं नाव आहे ३६ गुणी जोडी (36 Guni Jodi). झी मराठीवरील या नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या मालिकेची टॅगलाइन आहे प्रत्येक जोडी जुळत नसते. या मालिकेच्या निमित्ताने अनुष्का सरकटे आणि आयुष संजीव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनुष्का या मराठीवरील कारभारी लयभारी या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली होती.

३६ गुणी जोडी या मालिकेतील नायक नायिका विरुद्ध दृष्टिकोन असलेल्या दोन व्यक्ती आहेत. वेदांत हा एक सुप्रसिद्ध तरुण, प्रस्थापित उद्योगपती आहे तो स्त्रीपेक्षा पुरुषांच्या सहवासाला प्राधान्य देतो कारण त्याचा असा विश्वास आहे की पुरुष स्त्रीपेक्षा अधिक सक्रिय, कार्यक्षम, तीक्ष्ण आणि मेहनती आहे. तर अमुल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा असली तरी तिला हिमोफोबिया आहे. ती प्रेमळ, स्वैच्छिक, टॅलेंटेड आणि विनोदी असून ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची मजबूत बाजू आहे. शशांक सोळंकी यांची निर्मिती असलेल्या या मालिकेचं लेखन अनिल देशमुख यांनी केलं असून, दिग्दर्शन हरीश शिर्के यांचं आहे.

३६ गुणी जोडी पाहायला विसरू नका २३ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता आपल्या झी मराठीवर कारण प्रत्येक जोडी जुळत नसते!