Join us

अनुराग कोणाला घाबरतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 15:04 IST

अनुराग बासू सध्या सुपर डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. त्याने याआधी इंडियाज बेस्ट ड्रामेबाज आणि सिनेस्टार की ...

अनुराग बासू सध्या सुपर डान्सर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. त्याने याआधी इंडियाज बेस्ट ड्रामेबाज आणि सिनेस्टार की खोज या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारली होती. परीक्षण करणे हे खूपच कठीण असल्याचे अनुरागचे म्हणणे आहे. अनुराग सांगतो, "चित्रपटाची निर्मिती करणे अथवा दिग्दर्शन करणे हे परीक्षण करण्यापेक्षा खूप सोपे आहे. परीक्षण करण्याची मला खूप भीती वाटते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण यामुळे मला भयानक स्वप्नंदेखील पडतात. स्वप्नात लहान मुलांच्या नृत्याचे परीक्षण करत असताना ती मुले मलाही नृत्य करायला सांगतात. असे स्वप्न पाहिल्यावर मी डचकून जागा होतो."