Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कृष्णा चली लंडन' मालिकेत अनुुपम श्याम यांची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 07:15 IST

'कृष्णा चली लंडन' मालिकेत अभिनेते अनुपम श्याम यांची एन्ट्री होणार आहे.

ठळक मुद्देअनुपम श्याम दिसणार शुक्ला कुटुंबातील बडे पापाच्या भूमिकेत

स्टार प्लस वाहिनीवरील मालिका 'कृष्णा चली लंडन' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेत 'मन की आवाज प्रतिज्ञा' मालिकेत सज्जन सिंगच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेले अभिनेते अनुपम श्याम यांची एन्ट्री होणार आहे. ते या मालिकेत शुक्ला यांचे मोठे भाऊ म्हणजेच बडे पापाची भूमिका निभावताना दिसणार आहेत. 

याबाबत अनुपम श्याम म्हणाले की, 'आतापर्यंत मी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र आतापर्यंतची ही वेगळी भूमिका आहे. एक कलाकार म्हणून नेहमी वेगळे काही करण्याचा प्रयत्न असतो. मी शुक्ला कुटुंबातील प्रमुख मोठे पापाची भूमिका करतो आहे. जो वीस वर्षांनंतर आपल्या कुटुंबात परततो आहे. तो सर्व जग फिरून आलेला असल्यामुळे मॉडर्न आहे. यात मालिकेत त्याचा लूक वेगळा पाहायला मिळणार आहे. ही इतर पात्रांपेक्षा वेगळी व मनोरंजक भूमिका आहे. मी 'कृष्णा चली लंडन' मालिकेचा हिस्सा बनण्यासाठी खूप उत्सुक आहे. या मी बडे पापाच्या एन्ट्री सोबतच बरेच रहस्य उलडगणार आहे. त्यामुळे शुक्ला कुटुंबात भूकंप येणार आहे.' 'कृष्णा चली लंडन' २१ वर्षीय देखण्या राधेलालची कथा आहे.त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमाविणे, कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी स्वाभाविक असली, तरी राधेचे एकच स्वप्न असते ते म्हणजे लग्न करणे! राधे हा तसा स्वप्नाळू स्वभावाचा असून आपल्या पत्नीच्या शोधात असतो. कृष्णा मात्र महत्त्वाकांक्षी असते आणि तिला सारे जग पाहायचे असते.