‘लिप सिंग बॅटल’च्या सेटवर झाला आणखी एक अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 14:23 IST
‘लिप सिंग बॅटल’च्या चित्रीकरणाच्या वेळी नुकताच एक अपघात झाला होता. आयुषमान खुराणा या कार्यक्रमात मेरी पँट भी सेक्सी, मेरी ...
‘लिप सिंग बॅटल’च्या सेटवर झाला आणखी एक अपघात
‘लिप सिंग बॅटल’च्या चित्रीकरणाच्या वेळी नुकताच एक अपघात झाला होता. आयुषमान खुराणा या कार्यक्रमात मेरी पँट भी सेक्सी, मेरी शर्ट भी सेक्सी या गाण्यावर नृत्य सादर करणार होता. या गाण्यासाठी तो पाणीपुरीवाला बनणार होता. त्याचा परफॉर्मन्स सर्वोत्तम असावा असे वाटत असल्याने दृश्य चित्रीत करण्याआधी तो नृत्याची तालीम करत होता. पण या तालमीच्या वेळी एक अपघात घडला. डान्सची तालीम करण्यासाठी सेटवर पाणीपुरीचा थैला देखील लावण्यात आला होता. पण पाणीपुरीसाठी बनवण्यात आलेले सगळे पाणी स्टेजवर सांडले आणि त्यातील काही पाणी आयुषमानच्या डोळ्यात देखील गेले. त्यामुळे डॉक्टरांना सेटवर बोलवावे लागले होते. आयुषमाननंतर आता रॅपर रफ्तारचा या कार्यक्रमाच्या सेटवर अपघात झाला. रफ्तारने नुकतेच लिप सिंग बॅटल या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. त्याने एक धमाकेदार परफॉर्मन्स या कार्यक्रमात साजरा केला. त्याने या परफॉर्मन्ससाठी प्रभुदेवासारखा वेष धारण केला होता आणि त्याच्याच ‘उर्वशी’ या प्रसिद्ध गाण्यावर त्याने नृत्य सादर केले. आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने त्याने सर्वांना वेड लावले. पण हे नृत्य सादर करताना रफ्तारचा स्नायू दुखावला गेला आणि त्याला खूपच वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला ही गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही. पण काही वेळानंतर त्याला काही तरी त्रास होत असल्याचे फराह खानला जाणवले. या कार्यक्रमाच्या सेटवर उपस्थित असलेल्या काही मंडळींनी सांगितले, हे नृत्य सादर करताना रफ्तार अतिशय उत्साहित झाला होता. पण नाचताना त्याचा स्नायू दुखावला गेला. त्याचे ते अप्रतिम नृत्यकौशल्य पाहताना कोणाच्याही ही गोष्ट लक्षात आले नाही. मात्र फरहा खानच्या हे लक्षात येताच टीममधील सगळेजण त्याच्या मदतीसाठी धावले. पण दुखापत झालेली असताना देखील रफ्तारने गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. या गाण्याच्या चित्रीकरणानंतर लगेचच डॉक्टरला सेटवर बोलवण्यात आले. रफ्तारला तपासल्यानंतर डॉक्टरने त्याला किमान तासभर तरी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. परंतु तो काही मिनिटांतच चित्रीकरणासाठी पुन्हा उभा राहिला. Also Read : रवीना टंडनचा नवा अवतार तुम्ही पाहिला आहे का?