Join us

​आक्षका गोराडियाने पुन्हा एकदा केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 15:59 IST

आक्षका गोराडियाने साखरपुडा केला हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असणार. कारण आक्षकाने काहीच महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर ब्रेंट गोबलसोबत ...

आक्षका गोराडियाने साखरपुडा केला हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असणार. कारण आक्षकाने काहीच महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर ब्रेंट गोबलसोबत साखरपुडा केला होता. आता तिने कोणासोबत साखरपुडा केला हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. पण आक्षकाने दुसरा कोणासोबत नाही तर ब्रेंटसोबतच पुन्हा साखरपुडा केला आहे. त्यांनी हा साखरपुडा नुकताच मुंबईत केला आणि या साखरपुड्याला आक्षकाचे फिल्म इंड्स्ट्रीमधील अनेक मित्रमैत्रीण उपस्थित होते. आक्षका गोराडिया आणि ब्रेंटने मुंबईतील ओशिवारा येथे त्यांचा मित्र पोम्पीच्या घरात साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याला मौनी रॉय, अदा खान, सारा खान, सनम जोहर, करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी तीजे सिद्धू उपस्थित होते. आक्षका आणि ब्रेंटचा याआधी ब्रेंटच्या घरी म्हणजेच अमेरिकेला साखरपुडा झाला होता. गेल्या वर्षी ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरू असतानाच ब्रेंटने आक्षकाला लग्नाची मागणी घातली होती. गुडघ्यांवर बसून ब्रेंटने त्याच्या घरातल्यांसमोर आक्षकाला लग्नासाठी विचारले होते आणि अतिशय महागडी डायमंडची अंगठी देखील घातली होती. या साखरपुड्यानंतर काहीच महिन्यांनी पुन्हा साखरपुडा केला. पण आक्षका आणि ब्रेंटने भारतातदेखील साखरपुडा करावा असे त्यांच्या काही मित्रमैत्रिणींचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी साखरपुडा करण्याचे ठरवले. साखरपुड्यात दोघांनीही भारतीय पेहराव घातला होता. तसेच आक्षकाने हातावर सुंदर मेहेंदी देखील काढली होती. आक्षकाच्या साखरपुड्याचे फोटो अदा खान या तिच्या मैत्रिणीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओदेखील तिने पोस्ट केला आहे. Also Read : ​आक्षका गोराडिया प्रियकर ब्रेंट गोबलसोबत करणार अहमदाबादमध्ये लग्न