अनिता हसनंदानी झळकणार 'नागिन 3' मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 12:18 IST
कलर्सचा लोकप्रिय सुपरनॅचरल थ्रिलर मालिका नागीण टेलिव्हिजन लवकरच येत आहे आणि अजून एका लक्षवेधक सीजन ने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार ...
अनिता हसनंदानी झळकणार 'नागिन 3' मध्ये
कलर्सचा लोकप्रिय सुपरनॅचरल थ्रिलर मालिका नागीण टेलिव्हिजन लवकरच येत आहे आणि अजून एका लक्षवेधक सीजन ने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नागीनचा हा तिसरा सीझन खात्रीने मंत्रमुग्ध करणारा असणार आहे आणि त्यात रागीट साप म्हणून टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील काही नामवंत नावे दिसणार आहेत, जसे की करिश्मा तन्ना आणि अनिता हसनंदानी.समकालीन आणि आधुनिक थीम वर आधारीत, तरिश्मा तन्ना आणि अनिता हसनंदानी प्लम आणि लाल पोशाखात दिसणार आहेत आणि नागिणी म्हणून त्या अतिशय आकर्षक दिसणार आहेत. साप अवतारात या दोघी अतिशय मोहक तर दिसतच आहेत शिवाय नागिनच्या चाहत्यांना आनंद होण्याचे अजून वेगळे कारण आहे. टेलिव्हिजन वरील देखणा हंक रजत टोकस सुध्दा आकार बदलणाऱ्या सापाच्या भूमिकेत दिसणार आहे, त्याने पहिल्या सीझनमध्ये मुंगसाची भूमिका साकारली होती.आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर याआधी न पाहिलेल्या अवतारात रजत टोकस परत येत आहे. स्त्रोतांनी सांगीतल्या प्रमाणे, रजत अचूक रेखीव शरीर व्हावे म्हणून अतिशय मेहनत करत आहे. या शो मधील त्याच्या भूमिके साठी तो बरोबर आहार घेत आहे आणि रेखीव शरीरयष्टी होण्यासाठी तो व्यायामही करत आहे. करिश्मा तन्ना तिच्या भूमिके विषयी बोलताना म्हणाली, नागीण ही टेलिव्हिजन वर अतिशय गाजलेली मालिका आहे आणि ही भूमिका मला मिळाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. कलर्स कुटुंबा सोबत पुन्हा काम करण्याची मी वाट पहात होते. नागीनचा हा तिसरा सिक्वेल प्रेक्षकांना त्यांच्या खुर्चीत खिळवून ठेवणार आहे.” अनिता हसनंदानी म्हणाल्या, ''मी याआधी केलेल्या भूमिकांपेक्षा ही अगदी वेगळी आहे आणि भारतातील सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या सुपरनॅचरल शो-नागीन मध्ये सहभागी होण्याचा मला आनंद झाला आहे.”या आश्चर्यकारक कलाकारांसोबत आणि त्यांच्या करिस्माटिक लुक सोबत नागिन 3 चा हा सीझन प्रेक्षकांना आधीच्या सीझनसारखाच लक्षवेधक ट्विस्टने खिळवून ठेवेल अशी आम्हाला आशा आहे.